Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. वॉल कंपाऊंडला आले कोटीचे मोल; अनेकदा दुरुस्त करूनही मिटला नाही घोळ..!

अहमदनगर :

Advertisement

राज्यातील सरकारी दवाखान्यांची अवस्था फार चांगली राहिलेली नाही. यामध्ये सुधारणा करण्यासाठी सरकारी पातळीवर सुद्धा ठोस प्रयत्न होत नाहीत ही बाब देखील आता नवीन राहिलेली नाही. या कारभारामुळे दवाखान्यांची सुरक्षा मात्र धोक्यात आली आहे. दवाखान्यांचे रुपडे पालटण्यासाठी प्रयत्न होत असतीलही मात्र यामध्ये सातत्य आणि वेगवान कार्यवाही होत नाही, हे देखील तितकेच खरे.. 

Advertisement

आता मात्र आरोग्य विभागाने दवाखान्यांच्या देखभाल दुरुस्तीकडे लक्ष देण्याचे ठरवले आहे. राज्यातील सरकारी दवाखान्यांत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय याआधीच घेण्यात आला होता. त्यानुसार कार्यवाही देखील सुरू आहे. त्यानंतर आता राज्यात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा असणाऱ्या नगर जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयाबाबत एक निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे.

Advertisement

नगर शहरातील जिल्हा रुग्णालयाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या संरक्षक भिंतीचे बांधकाम करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक असणारे अंदाजपत्रक आणि बांधकाम आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या संरक्षक भिंत बांधकामासाठी तब्बल दोन कोटी 14 हजार रुपये इतका दणकून खर्च होणार आहे.  

Advertisement

राज्यात क्षेत्रफळाच्या दृष्टीने नगर हा सर्वात मोठा जिल्हा आहे. त्यामुळे येथील जिल्हा रुग्णालयात रुग्ण येत असतात. येथे मात्र रुग्णांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. सद्यस्थितीत येथे अनेक अडचणी भेडसावत आहेत. या अडचणींतून मार्ग काढण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.

Loading...
Advertisement

रुग्णालयाच्या संरक्षक भिंतीचे याआधी अनेक वेळा दुरुस्ती करण्यात आली. मात्र, काही दिवसातच भिंत खराब असायची. भिंतीच्या दुरुस्तीसाठी याआधी लाखो रुपये खर्च करण्यात आले. मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही. त्यानंतर आता पुन्हा एकदा या भिंतीचे बांधकाम करण्याचे आरोग्य विभागाने ठरवले आहे.

Advertisement

सार्वजनिक आरोग्य विभागाने अंदाजपत्रक आणि बांधकाम आराखड्यास मंजुरी दिली आहे. प्रशासकीय कार्यवाहीस आणखी काही काळ जाणार आहे. भिंतीचे बांधकाम होईल हे खरेच आहे मात्र भिंत पुन्हा खराब होणार नाही, याकडे लक्ष द्यावे लागणार आहे.

Advertisement

बातमी लेखन व संपादन : मुकुंद भालेराव

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply