Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

म्हणून बंद पडले होते व्हॉट्सअॅप; इन्स्टाग्रॅम- फेसबुकचे मेसेंजरही होते डाऊन..!

मुंबई :

Advertisement

जगभरातील कोट्यवधी मोबाइल धारकांच्या जीवनाचा घटक असलेले व्हॉट्सअॅप थोडा वेळ जरी काम करेनासे झाले की सर्व काही ठप्प होतेय, असे वाटतेच. परंतु, हे व्हॉट्सअॅप डाउन होते तरी कोणत्या कारणामुळे याचा विचार आपण कधी केलाय का?

Advertisement

काहींच्या डोक्यात हा प्रश्न आला असेलही मात्र या प्रश्नाचे उत्तर मिळत नसल्याने त्यांच्या दृष्टीने हा प्रश्न सध्या तरी एक कोडे बनला आहे. एवढेच काय तर कंपनीने देखील व्हॉट्सअॅप बंद का होतं ? या प्रश्नाचे थेट उत्तर देणे टाळले आहे. कंपनीने या प्रश्नाचे प्रथमच स्पष्टीकरण दिले आहे. 

Advertisement

काय आहे कंपनीचे स्पष्टीकरण..

Advertisement

भारतासह बहुतांश देशात काल रात्री म्हणजेची शुक्रवारी अकरा वाजण्याच्या सुमारास व्हॉट्सअॅप अचानक बंद पडलं. ना कुठेल मेसेज जात होते ना येत होते. व्हिडीओ कॉलिंगही बंद. लोकांनी मोबाईल चालू बंद करुन बघितले पण काहीच उपयोग नाही. शेवटी व्हॉट्सअॅप डाऊन झाल्याचं अधिकृतपणे कळवलं गेलं.

Loading...
Advertisement

मध्यरात्रीच्या सुमारास पुन्हा व्हॉटसअॅप सुरू झालं. त्यावर कंपनीनं ट्विटरवर पहिल्यांदाच अधिकृतपणे वक्तव्य जारी केलं आहे. यामध्ये कंपनीने असुविधेबद्दल दिलगीर आहोत असे स्पष्ट केले. आमच्यासाठी ती ४५ मिनिटे खूप मोठा काळ होता, तुम्ही धैर्य ठेवलंत त्याबद्दल धन्यवाद. पण आता आम्ही परत आलो आहोत, एवढेच स्पष्टीकरण देण्यात आले आहे. 

Advertisement

या काळात केवळ व्हॉट्सअॅप बंद होत असे नाही तर इन्स्टाग्रॅम आणि फेसबुकचे मेसेंजर सुद्धा डाउन होते. या काळात जगाशी संपर्क बंद पडल्यासारखी स्थिती होती. या पाऊण तासांच्या काळात संभ्रमाचे वातावरण होते.

Advertisement

संपादन : मुकुंद भालेराव

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply