Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

‘महाविकासवाल्यां’नी पंकजा मुंडे यांच्यावर केल ‘हा’ आरोप; पहा नेमके काय म्हटलेय त्यांनी

बीड / औरंगाबाद :

Advertisement

बीड जिल्हा सहकारी बँक निवडणुकीतून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी माघारी घेतली आहे. महाविकास आघाडी सरकारवर पक्षपाताचा आरोप करीत त्यांनी हे महत्वाचे पाउल उचलले आहे. त्यावर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Advertisement

राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस व मित्रपक्ष मिळून शेतकरी विकास पॅनलअंतर्गत जिल्हा बँकेच्या ६ जागा लढवत असल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जाहीर केले आहे. महाविकास आघाडीने यावर म्हटले आहे की, कुणी माघार घेतली तरीही निवडणुकीला शंभर टक्के क्षमतेने सामोरे जाऊन मतदान प्रक्रिया पार पाडावी.

Advertisement

एकूणच महाविकास आघाडीने मतदान प्रक्रिया जोरात पार पडण्याचे आवाहन केले आहे. तसेच भाजपने आत्मविश्वास गमावल्याने असा निर्णय जाहीर केल्याचाही दावा त्यांनी केला आहे.

Loading...
Advertisement

दरम्यान, या निवडणुकीची ही संपूर्ण प्रक्रियाच खोटी असून केवळ आठ जागांसाठी निवडणूक होत असल्याने तेरा जागांचा कोरम पूर्ण होत नाही, मग निवडणूकच कशाला, असा प्रश्न पंकजा मुंडे यांनी केला आहे. तसेच प्रशासक आणण्याचा सत्ताधाऱ्यांच्या कारस्थानाचा आम्ही निषेध करतो. शनिवारच्या मतदानावर आमचा बहिष्कार आहे, त्यांनी म्हटलेले आहे.

Advertisement

बीडमध्ये १९ पैकी ८ जागांवर निवडणूक होत असलेल्या बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीतून मतदानाच्या आदल्या दिवशी भाजपने माघार घेतली आहे. त्याची चर्चा राज्यभरात आहे. निवडणुकीत सेवा संस्था मतदारसंघातील ११ जागांवर उमेदवार ठेवण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना अगदी सर्वाेच्च न्यायालयातदेखील यश आले नाही. आता उर्वरित आठ जागांसाठीच्या मतदानावर भाजपने बहिष्कार घालून या निवडणुकीला नाट्यमय वळण दिले आहे. 

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

Advertisement

Leave a Reply