Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

अवकाळीचा बसला तडाखा; कोट्यावधींचे नुकसान, पहा काय आहे हवामानाचा अंदाज

औरंगाबाद :

Advertisement

करोनाचा कहर वाढत असतानाच आता महाराष्ट्रात अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. परिणामी औरंगाबाद, जालना आणि परभणी या मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे.

Advertisement

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार सध्या अवकाळी पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे. मराठवाड्यातील जालना व परभणी शहरांना अवकाळी पावसाने झाेडपून काढले आहे. तर, औरंगाबाद जिल्ह्यात काही भागात जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला आहे.

Advertisement

महाराष्ट्रावर चक्राकार वारे आणि कमी हवेचा दाब निर्माण झाल्याने अवकाळी पाऊस होत आहे. याचा फटका गहू, ज्वारी, मका, करडई, हरभरा, उन्हाळी कांदा, लसूण, भाजीपाला पिके आणि केशर आंबा, द्राक्ष, चिकू फळबागांना बसणार अाहे.

Advertisement

२० मार्च रोजी हिंगोली, नांदेड, लातूर, बीड व उस्मानाबाद, औरंगाबाद, परभणी व जालना जिल्ह्यात वादळी वारा, मेघगर्जनेसह पाऊस, गारपीट होण्याची शक्यता आहे. २१ मार्च रोजी औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, २२ मार्च रोजी औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, परभणी आणि २३ मार्चला औरंगाबादसह बीड जिल्ह्यात वादळी वारे, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

Advertisement

भोकरदन, औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात व परभणीतील साेनपेठ तालुक्यात उकडगाव ते वडगाव परिसरात मेघगर्जनेसह गारपीट झाली. कांदा, गहू, हरभरा, हळद, शाळू ज्वारी या पिकांबरोबरच द्राक्ष बागांनाही याचा मोठा फटका बसला आहे.

Loading...
Advertisement

१९ मार्च रोजी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान वादळी वारा व गारपिटीसह अवकाळी पावसाने शेतकऱ्यांनी सोंगणी करून ठेवलेल्या पिकांसह शेतात उभी असलेली पिके अाडवी पडल्याने या भागातील शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे एकाच झटक्यात नुकसान झाले आहे.

Advertisement

हिमायतनगर तालुक्यामध्ये पारवा (बु.) येथेही पाऊस झाला. या पावसात बसस्थानकाशेजारी असलेल्या दिगंबर भाऊराव पिंगळे यांच्या शेतातील आखाड्याजवळ लिंबाच्या झाडावर गुरुवारी रात्री ८ ते ९ च्या दरम्यान वीज पडली. परिणामी झाडाखाली बांधून असलेल्या गाय व मुरा जातीच्या म्हशी दगावल्या आहेत.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

ता. क. आपल्या भागातील अशाच शेतीकथा, शेतीव्यथा, यशकथा, शेतीचे प्रश्न, प्रयोग आणि कृषी व ग्रामीण विकासाच्या बातम्या, व्हिडिओ आणि लेख आपण krushirang@gmail.com या ईमेलवर पाठवून द्या. संबंधित शेतकरी, लेखक व व्हिडिओग्राफर यांच्या नाव व पत्त्यासह त्यास आम्ही ठळक प्रसिद्धी देऊ.

Advertisement

Advertisement

Leave a Reply