Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

म्हणून पंकजाताईंनी सोडले धनंजय मुंडे यांच्यासाठी मैदान; भाजपला मोठा झटका..!

बीड / औरंगाबाद :

Advertisement

बीड जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अखेर वेगळाच ट्विस्ट आलेला आहे. पालकमंत्री धनंजय मुंडे सत्तेचा गैरवापर करत आहेत, असा आरोप करत बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीवर भाजपने बहिष्कार घालण्याचा निर्णय भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी जाहीर केला आहे.

Advertisement

पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, जिल्हा बँकेची निवडणूक होणार आहे. निवडणूक लढवूनही फोरम पूर्ण होत नसल्याने बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदर्भात पंकजा मुंडें यांनी थेट राज्यपालांकडे तक्रार केली आहे.

Advertisement

जिल्हा बँकेच्या 11 जागेवरील अर्ज बाद झाले होते. त्यामुळे फ़क़्त 8 जागेसाठी ही निवडणूक होत आहे. हकार मंत्र्याला हाताशी धरून हे सर्व काय चाललं आहे. औरंगाबाद आणि इतर जिल्ह्यांना जो न्याय दिला, तो बीडला नाही याकडे लक्ष वेधून पंकजा मुंडे यांनी निवडणुकीत सत्ताधारी पक्ष गैरवापर करीत असल्याचे म्हंटले आहे.

Loading...
Advertisement

सत्ताधारी पक्ष सत्तेचा गैरवापर करत असून बुडालेली जिल्हा बँक सुरळीत करण्याचे काम गेल्या पाच वर्षांमध्ये केलं. आता बँकेचं वाटोळे करण्याचं सत्ताधार्‍यांनी ठरवलं आहे, असे देखील पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषदेत म्हंटले आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

Advertisement

Leave a Reply