Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ 3 कारणांमुळे गृहमंत्री देशमुख यांच्या राजीनाम्याच्या चर्चांना आलेय उधाण..!

मुंबई :

Advertisement

मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची बदली झाल्यानंतर आता गृहमंत्री सुद्धा बदलणार असल्याच्या चर्चेला उधाण आलेले आहे. दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अँटिलिया प्रकरणात पक्षाचे नेते शरद पवार यांची दिल्लीत भेट घेतली आहे. तर, नवभारत टाईम्स या वृत्तपत्राने 3 कारणांसह देशमुख यांचा राजीनामा घेतला जाण्याचा शक्यतेची बातमी प्रसिध्द केली आहे.

Advertisement

बातमीत पहिली शक्यता म्हणून म्हटले आहे की, सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ उभी असलेल्या स्कॉर्पिओमध्ये ठेवलेल्या स्फोटक प्रकरणात ज्या प्रकारे पोलीस अधिकारी सचिन वाझ यांचे नाव देण्यात आले आहे. ते बघून शरद पवारांना वाटते की देशमुख हे गृहमंत्रालय चालवण्यासाठी तितके प्रभावी राहिलेले नाहीत. कारण या प्रकरणामुळे महाविकास आघाडी सरकारला बॅकफूटवर यावे लागले आहे.

Advertisement

दुसरी शक्यता दिली आहे की, मुंबई पोलिस आणि सचिन वाझे यांच्यामुळे महाराष्ट्राच्या गृहमंत्रालयाची जबरदस्त नामुष्की देश आणि जगासमोर झाली आहे. यामुळे देशमुख यांच्यावर राजीनामाची तलवार टांगली जात आहे.

Advertisement

तर, तिसऱ्या मुद्द्यात म्हटले आहे की, या प्रकरणानंतर अनिल देशमुख यांचे मनोबल खूपच कमी झाले असल्याचे शरद पवारांनाही वाटते. मुख्यमंत्रीपदानंतर सर्वात महत्त्वाचा विभाग मानल्या जाणार्‍या गृहमंत्रालयाबाबत राष्ट्रवादी आग्रही आहे. त्यामुळे देशमुख यांचा राजीनामा झाल्यास त्यांच्या जागी जयंत पाटील यांना गृहमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.

Loading...
Advertisement

एकूणच नवभारत टाईम्स यांनी शक्यता आणि एकूण घडामोडी लक्षात घेऊन ही बातमी दिलेली आहे. राजकारणात काहीही होऊ शकते, असा मतप्रवाह आहेच. त्यामुळे शक्यतांचा आडाखा लावून हे सर्व प्रसिद्ध केले जात आहे.

Advertisement

आयुक्त परमवीर सिंग यांच्या बदलीपुर्वीही बैठकांवर बैठका झाल्या होत्या. आताही त्याचा पद्धतीने बैठका होत असल्याकडे नवभारत टाईम्स यांनी लक्ष वेधले आहे.

Advertisement

संपादन : विनोद सूर्यवंशी

Advertisement

Advertisement

Leave a Reply