Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

अमेरिकेने सुनावले चीनला; पहा कोणत्या बैठकीत मतभेद झाले स्पष्ट

दिल्ली :

Advertisement

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाचा पदभार जो बायडन यांनी स्वीकारल्या नंतर प्रथमच अमेरिका आणि चीनमधील प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत मात्र काही मुद्द्यांवरून दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये मतभेद स्पष्टपणे समोर आले आहेत.

Advertisement

दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांच्या विरोधी मत मांडल्याचे यावेळी पहायला मिळाले. अलास्कामध्ये या बैठ्कीचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्राच्या सुरुवातीलच अमेरिकन परराष्ट्र मंत्री एंटनी ब्लिंकन आणि चीनमधील कम्युनिस्ट पक्षाच्या परराष्ट्र संबंधांविषयक प्रमुख यांग जियेची यांनी आपआपल्या देशाची भूमिका मांडतानाच समोरच्या देशातील धोरणांवर टीका केल्याचे दिसून आले.

Advertisement

जगातील या दोन्ही देशांमध्ये सध्या तणाव  सुरु आहेत. दोन्ही देशांमधील तणावपूर्ण संबंधांची परीक्षा घेणारी ही बैठक ठरणार असल्याची शक्यता या बैठकीपूर्वीच राजकीय जाणाकारांनी व्यक्त केली होती. 

Advertisement

तिबेट, हाँगकाँग आणि चीनच्या पश्चिमेकडील शिनझियांग क्षेत्रातील व्यापार तसेच मानवाधिकारांच्या उल्लंघनासंदर्भातील मुद्द्यावर मतभेद दिसून आले. तसेच तैवान, दक्षिण चीनचा समुद्र आणि त्यामध्ये चीनचा वाढता प्रभाव याचबरोबर करोनाचा संसर्ग आणि जगभरामध्ये झालेला प्रादुर्भाव या मुद्द्यांवरुनही दोन्ही पक्षांमध्ये चांगलीच वादळी चर्चा झाल्याचे समजते. 

Loading...
Advertisement

ब्लिंकन यांनी बायडन प्रशासनाची चीनविरोधी भूमिका स्पष्ट शब्दांमध्ये मांडली. चीनच्या विस्तावरवादी प्रवृत्तीविरोधात अमेरिका इतर सहकारी देशांच्या पाठिशी ठामपणे उभा आहे असं ब्लिंकन यांनी चिनी अधिकाऱ्यांना सांगितलं. यानंतर यांग यांनी अमेरिकेच्या भूमिकेसंदर्भात चीनला असणारे आक्षेप आणि इतर विषयांसंदर्भात चीनच्या भूमिकेपेक्षा अमेरिकीची भूमिका वेगळी कशी आहे. हे स्पष्ट केले.

Advertisement

सध्या या दोन्ही देशांमधील संबंध कमालीचे ताणवपूर्ण आहेत. त्यातच आता या देशांमधील बैठकीचा पहिला टप्पा पाहता दोन्हीकडील विरोधामुळे जागतिक शांततेला धोका निर्माण होणारं पाऊल या देशांकडून उचललं जाण्याची भीतीही काही जाणकारांनी व्यक्त केलीय.

Advertisement

संपादन : मुकुंद भालेराव

Advertisement

Advertisement

Leave a Reply