Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Lock-down : करोना उद्रेक जोरात; पॅरिससह ‘त्या’ 16 शहरांमध्ये महिनाभराचा लॉकडाऊन..!

पॅरिस :

Advertisement

जगभरात करोना विषाणूचा वाढता उद्रेक लक्षात घेऊन सरकारी पातळीवर उपापयोजना लागू करण्यात येत आहेत. महाराष्ट्रात कार्यालयांमध्ये 50 टक्के क्षमतेने कर्मचारी ठेवण्याच्या नियमाची अंमलबजावणी होत असतानाच युरोपातील फ्रांस देशात 16 शहरामध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आलेला आहे.

Advertisement

फ्रांसमध्ये कोरोनाची तिसरा लाट आल्याचा धसका सर्वांनी घेतला आहे. त्यामुळे  पॅरिससह इतर 15 शहरांमध्ये शुक्रवारी रात्रीपासून एक महिन्याचा लॉकडाउन लागू करण्याची घोषणा पंतप्रधान जीन कॅस्टेक्स यांनी केली आहे.

Advertisement

कॅस्टेक्स यांनी म्हटले आहे की, लॉकडाउन आधिप्रमाणे कडक नसेल. लॉकडाउनच्या काळातही आवश्यक वस्तुंची विक्री सुरू ठेवली जाईल. याशिवाय, नर्सरी, एलिमेंट्री आणि हायस्कूलदेखील सुरू राहतील. या लॉकडाउनच्या काळात लोक घराबाहेर पडू शकतील. पण, त्या सर्वांना कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल.

Loading...
Advertisement

यूरोपियन मेडिसिन एजेंसी (EMA) संस्थेच्या क्लीनचिटनंतर यूरोपियन देश लवकरच एस्ट्राजेनेका-ऑक्सफोर्डच्या कोरोना लसीचा वापर पुन्हा सुरू होत आहे. स्पेन, पुर्तगाल, नीदरलंड, जर्मनी, इटली, फ्रांस, लात्विया, लिथुआनिया आणि साइप्रससह अनेक देशात या लसच्या वापरावर बंदी घातली होती. त्यांनी त्यास हिरवा कंदील दिला आहे.

Advertisement

तर, आयरलंड आणि स्वीडनमध्ये परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर लस वापरायची किंवा नाही याचे निर्णय होणार आहेत. दरम्यान, फ्रांसमध्ये कोरोनाचा संसर्ग फार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अनेक नवीन व्हेरिएंटसह फ्रांसमध्ये महामारीची तिसरी लाट आली आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

Advertisement

Leave a Reply