Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

‘त्यासाठी’ देशमुखांनी दिल्लीत घेतली पवारांची भेट; पहा काय म्हटलेय पत्रकारांशी बोलताना

दिल्ली :

Advertisement

सध्या सचिन वाझे या पोलीस अधिकाऱ्यांच्या प्रकरणामुळे मुंबई पोलीस आणि राज्य सरकार यांच्यावर मोठा दबाव आहे. त्याचवेळी गृहखात्यात बदलाची मागणी होत असतानाच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांची भेट घेतली आहे.

Advertisement

भेट झाल्यावर त्यांनी ही भेट नागपूर येथील मिहान प्रकल्पाच्या मुद्द्यावर असल्याचे म्हंटले आहे. मात्र, पत्रकारांनी त्यांना मुंबईतील घटनेबद्दल तिथेही प्रश्न केले आहेत. या बैठकीत आपण अँटिलिया प्रकरणात पवारांना सद्यस्थितीची माहिती दिली असे अनिल देशमुख म्हणाले आहेत.

Advertisement

देशमुख यांनी सांगितले की, प्रामुख्याने नागपूरच्या मिहान प्रकल्पासंदर्भात शरद पवारांची भेट घेतली. टिलिया प्रकरणात पवारांना सद्यस्थितीची माहिती दिली आहे. सध्या राष्ट्रीय तपास संस्था आणि दहशतवाद विरोधी पथकाकडून तपास केला जात आहे. हा तपास सध्या योग्य दिशेने सुरू आहे. एवढेच नव्हे, तर या तपासामध्ये राज्य सरकारकडून तपास संस्थांना पूर्णपणे सहकार्य केले जात आहे.

Loading...
Advertisement

संपूर्ण प्रकरणात गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने मोर्चेबांधणी केली आहे. दबाव वाढत असतानाच गृहमंत्र्यांनी दिल्लीत जाऊन पवारांची भेट घेणे यातून चर्चांना आणखी उधाण आले आहे. आता महाविकास आघाडीत बदलाची हवा तर नाही ना, असाच संशय व्यक्त होत आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

Advertisement

Leave a Reply