Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

गॉडफादर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; राणे यांनी वाझेप्रकरणी केला ‘असा’ प्रहार..!

मुंबई :

Advertisement

मुंबई पोलिसांचे अधिकारी सचिन वाझे यांच्या प्रकरणामुळे सध्या अवघे राज्य ढवळून निघाले आहे. याप्रकरणी विरोधी पक्ष असलेल्या भाजपने गृहखात्यात बदलाची मागणी लावून धरली आहे. त्याचवेळी आता माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच गॉडफादर म्हणत त्यांचा राजीनामा मागितला आहे.

Advertisement

भाजप नेते नारायण राणे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना म्हटले आहे की, ठाकरे सचिन वाझेंचे गॉडफादर आहेत. या सर्व प्रकरणाला मुख्यमंत्रीच जबाबदार आहेत. त्यांना एक दिवसही खुर्चीवर राहण्याचा अधिकार नाही.

Advertisement

संसद भवनात मीडियाशी संवाद साधताना त्यांनी महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेना यांच्यावर जबरदस्त प्रहार केला आहे. त्यांनी म्हटले की, निलंबित वाझे यांना ठाकरेंनी मुख्यमंत्री झाल्यावर पोलीस खात्यात परत घेतले. नंतर तर त्यांच्याकडे थेट क्राईम इंटेलिजन्स यूनिटची जबाबदारीच दिली. मुख्यमंत्र्यांमुळेच वाझे पोलीस दलात परत आल्याने मुख्यमंत्री हेच वाझेंचे गॉडफादर असल्याचे दिसून येते.

Loading...
Advertisement

ख्यमंत्र्यांनी वाझेंकडून सर्व कामे करून घेतली. त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुखांच्या आधी मुख्यमंत्र्यांनीच राजीनामा द्यावा. सुशांतसिंह राजपूत, दिशा सालियन, पूजा चव्हाण आणि मनसुख हिरेन यांच्या हत्या झाल्या. यातील बहुतेक प्रकरणे वाझेंकडे देण्यात आली होती. संबंध नसतानाही वाझेंकडे ही प्रकरणे का दिली, असा प्रश्न करून राणे यांनी ठाकरेंना घेरले आहे.

Advertisement

आता याप्रकरणी मुख्यमंत्री कार्यालय किंवा शिवसेना यांच्याकडून कोणती प्रतिकिया येते, याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

Advertisement

Leave a Reply