Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

त्यामुळे घर, कार आणि यंत्रसामग्रीही महागणार; पहा कोणत्या एकाच घटकाने दिलाय सगळ्यांना दणका..!

पुणे :

Advertisement

इंधन दरवाढ हा मुद्दा असतानाच आता अनेक सेक्टरमध्ये महत्वाचा घटक असलेल्या स्टीलच्या भाववाढीचा झटका देशाला सहन करावा लागत आहे. या एका घटकाच्या वाढीमुळे कार, घर आणि अनेक प्रकारची यंत्रसामग्री यांचे भाव वाढायला लागले आहेत.

Advertisement

घर किंवा कार घेण्याचे स्वप्न महाग होण्याला सर्वात मोठे कारण ठरले आहे स्टीलची वाढणारी किंमत. बांधकाम आणि वाहन क्षेत्रातील वाढती मागणी यामुळे त्याचे दर दोन टक्क्यांहून अधिक वाढले आहेत. इमारत बांधकाम आणि वाहन क्षेत्रासह जड यंत्रसामग्री, गाड्या, विमान आणि शस्त्रे यासारख्या इतर उत्पादनांसाठीही ही मूलभूत वस्तू आहे.

Advertisement

कमॉडिटी एक्सचेंजवर स्टीलची फ्यूचर किंमत 41,450 रुपयाच्या जवळपास गेली आहे. तर त्याची स्पॉट किंमत 40,850 रुपये आहे. बाजार तज्ज्ञांच्या मते, या वर्षाच्या अखेरीस त्याची मागणी वाढत राहिल्यास 45 हजारांची पातळी सहजपणे नोंदवली जाऊ शकते.

Loading...
Advertisement

कोरोना साथीच्या रोगामुळे जगभरात लोखंड आणि इतर धातू यांची कमतरता कायम आहे. त्यातच करोनाची नवी लाट येण्याच्या शक्यतेमुळे उद्योगही अडचणीत आहेत. स्टील उद्योग हा जागतिक विकासाचे मूळ आहे. आर्थिक विकासासाठी आणि मानवी संस्कृतीचा कणा मानला गेलेल्या स्टीलला अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाचे स्थान आहे. कारण, याचा ‘दरडोई वापरा’ हा देशातील लोकांच्या राहणीमान आणि सामाजिक-आर्थिक मानकांचे मोजमाप ठरवतो.

Advertisement

उत्पादनाच्या बाबतीत विचार केल्यास वर्ल्ड स्टील असोसिएशनच्या संकेतस्थळावर दिलेल्या आकडेवारीनुसार, जानेवारी 2021 मध्ये भारतात स्टीलचे वार्षिक उत्पादन 7.6 टक्क्यांनी वाढले तर चीनमध्ये ते 6.8 टक्के वाढले. मात्र, मागणीनुसार त्याची कमतरता भासू लागली आहे. मागणी अमेरिकेत वाढली आहे पण उत्पादन 9.9 टक्क्यांनी घटले आहे. जानेवारी 2021 मध्ये जगात 16.29 लाख टन पोलाद उत्पादन झाले. जे वार्षिक आधारावर लक्षात घेतल्यास फक्त 4.8 टक्क्यांनी अधिक होते.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

Advertisement

Leave a Reply