Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

म्हणून राज्य सरकारपुढे ओढवली नामुष्की; अखेर दुध भुकटीच्या मुद्द्यावरही शोधली ‘अशी’ पळवाट..!

अहमदनगर :

Advertisement

सरकारी यंत्रणेचा निष्काळजीपणा हा एका वेगळ्या अभ्यासाचा असा विषय अजिबात राहिलेला नाही. मुळात जनतेला सेवेमध्ये अकार्यक्षम असलेल्या यंत्रणेला व्यावसायिक कौशल्य तर अजिबातच नसतात. त्याचाच प्रत्यय दुध भुकटी बनवून त्याची विक्री करण्याच्या प्रकरणातही आलेला आहे.

Advertisement

करोना लॉकडाऊनमुळे राज्यात मोठ्या प्रमाणात अतिरिक्त दुधाचा प्रश्न निर्माण झाला होता. या अतिरिक्त ठरणाऱ्या दुधाचे काय करायचे असा प्रश्न राज्य सरकारला सतावत होता. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी अतिरिक्त दुधाची भुकटी तयार करण्याचा निर्णय त्यावेळी राज्य सरकारने घेतला होता. मात्र, आता हीच भुकटी सरकारची डोकेदुखी बनली आहे.

Advertisement

त्यावेळी दुधाची खरेदी संघांद्वारे करुन त्यापासून दूध पावडर तयार करण्यात आली. परंतु, आता मात्र एक नवेच संकट समोर ठाकले आहे. ते आहे उत्पादित दुधाच्या भुकटीचे करायचे काय? कारण तिची वेळेत पॅकिंग करण्याची कार्यवाही काही होईल असे नाही.

Advertisement

राज्य सरकारपुढे काय आहे हे संकट आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी कृषी व पशुसंवर्धन काय शक्कल केली आहे, हे जाणून घेऊया.. करोना काळात सुरवातीला देशभरात कडक लॉकडाउन होता. या काळात सर्व व्यवहार ठप्प असल्याने दूध मोठ्या प्रमाणात अतिरिक्त ठरत होते. या अतिरिक्त दुधाचा प्रश्न होता. त्यामुळे या अतिरिक्त ठरणाऱ्या दुधाचे संकलन करुन भुकटी तयार करण्याचा निर्णय राज्य सरकारने एप्रिल २०२० मध्ये घेतला होता.

Advertisement

या योजनेंतर्गत राज्यातील सहकारी दूध संघांमार्फत दूध खरेदी करण्यात आले. त्यानंतर यावर प्रक्रिया करुन दूध पावडर तयार करण्यात आली. पुढील टप्प्यात दूध भुकटी पॅकिंग करुन अंगणवाड्यांना पोहोच केले जाणार होते. परंतु, हे काही केल्या शक्य झाले नाही. या योजनेंतर्गत तयार करण्यात आलेली ५ हजार ७५० मेट्रीक टन दूध भुकटी २५० ग्रॅम प्रमाणे पॅकेट तयार करुन राज्यातील अंगणवाड्यांना पुरवठा करण्याचे कामच ठप्प आहे.

Loading...
Advertisement

गेल्या दहा महिन्यांच्या काळात फ़क़्त २०० मेट्रीक टन दूध पावडरचे पॅकिंग करणे शक्य झाले आहे. तसेच १ हजार ३०० मेट्रीक टन दूध भुकटी पॅकिंगसाठी संबंधित ठेकेदारांकडे देण्यात आल्याचे राज्याच्या कृषी विभागाने म्हटले आहे. सध्याची कार्यवाही पाहता २५० ग्रॅमचे पॅकेट तयार करुन प्रति महिना ४०० मेट्रीक टन उपलब्ध करुन देण्याचे उद्दीष्ट साध्य होईल याची शाश्वती आता खुद्द कृषी विभागालाही राहिलेली नाही.

Advertisement

त्यामुळे उर्वरीत दूध भुकटीचे करायचे काय यावर मागील महिन्यात मंत्रीमंडळाच्या बैठकीत चर्चा करुन मार्ग काढण्यात आला. त्यानुसार राज्यात आतापर्यंत ७ हजार ७६४ मेट्रीक टन दूध भुकटी तयार केली आहे. यापैकी १ हजार ५०० मेट्रीक टन दूध भुकटी पॅकेजिंगकरता देण्यात आली आहे. उर्वरीत ६ हजार २६४ मेट्रीक टन दूध भुकटी बाजारात विक्री करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या दूध भुकटी विक्री करण्याची जबाबदारी राज्यातील सहकारी दूध संघांना देण्यात आली आहे.

Advertisement

आता या भुकटीला किती भाव मिळणार आणि वेळेत याची खरेच विक्री करून चार पैसे मिळणार की कोट्यावधी रुपये पाण्यात जाणार याकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

बातमी लेखन व संपादन : मुकुंद भालेराव

Advertisement

Advertisement

Leave a Reply