Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

ठाकरेंना दिला त्यांच्याच मंत्र्यांनी झटका; पहा नेमके काय ‘करून दाखवले’य औरंगाबादमध्ये..!

औरंगाबाद :

Advertisement

निवडणुकीत जिंकण्यासाठी कोण नेता किंवा व्यक्ती कोणत्या पातळीवर जाईल याचा काहीही नेम नसतो. त्याचाच प्रत्यय सध्या महाविकास आघाडी सरकारमधील प्रमुख घटक असलेल्या शिवसेना या राजकीय पक्षाला आला आहे. कारण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सेना मंत्र्यांनी थेट भाजपशी घरोबा ‘करून दाखवला’ आहे.

Advertisement

औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे. त्यासाठी काँग्रेस आणि भाजप असे दोन्ही पॅनल रिंगणात आहेत. या जिल्ह्यात शिवसेनेची ताकद मोठी आहे. मात्र, आता त्यात उभी फुट पडली आहे. कारण, सेनेच्या एका गटाने थेट भाजपशी, तर दुसऱ्या गटाने काँग्रेसशी घरोबा केला आहे.

Advertisement

शिवसेनेचे मंत्री संदिपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार व अंबादास दानवे यांनी मुंबई शिवसेनेशी कोणत्याही प्रकारची चर्चा न करता थेट भाजपच्या पॅनलकडून उमेदवारी दाखल केली आहे. तर, शिवसेनेचे नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाबरोबर राहण्याचा निर्णय घेतला आहे.

Loading...
Advertisement

सेनेची सत्ता राज्यात आहे. त्यात मंत्री संदिपान भुमरे व राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना मनाचे पान वाढण्यात आलेले आहे. तरीही मुख्यमंत्री ठाकरे यांच्या सरकारच्या अडचणीत भर टाकणाऱ्या आणि टीका करणाऱ्या भाजपशी या दोन मंत्र्यांनी हातमिळवणी केल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

Advertisement

औरंगाबाद जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक २१ मार्च रोजी आहे. या निवडणुकीत भाजपचे नेते अामदार हरिभाऊ बागडे, माजी अामदार नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनल व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डाॅ. कल्याण काळे यांच्या नेतृत्वात शेतकरी सहकार विकास पॅनल यांच्यात थेट लढत होत आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

Advertisement

Leave a Reply