Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

पोल्ट्री फार्मिग : आहे मोठा स्कोप, परंतु..अडचणीही..; वाचा कुक्कुटपालनाची महत्वाची माहिती

एकूण जगाचा विचार केल्यास लोकसंख्येच्या चीननंतर भारताचा नंबर लागतो. मात्र, भारतात अजूनही मांसाहार करण्याबद्दल अनेक शंका-कुशंका असतात. तसेच इथे कोणताही रोग किंवा नैसर्गिक संकट आले की, सोशल मिडीयामध्ये पोल्ट्री फार्मिंगला बदनाम करण्याचे षड्यंत्र रचले जाते. सामान्य जनताही मग त्याला बळी पडते. करोना विषाणूमुळे होणाऱ्या कोविड १९ आजाराचा मोठा फटका या क्षेत्राला नुकताच बसला आहे. एकूणच लोकसंख्या आणि कुपोषणाचे प्रमाण लक्षात घेता मांसल कोंबड्या आणि अंडी यांना मोठी संधी आहे. मात्र, त्याला मर्यादाही आहेत.

Advertisement

जगाच्या १८ टक्के लोकसंख्या असलेल्या भारतात सर्वाधिक पोल्ट्री फार्म असायला हरकत नाही. मात्र, एकूण जगाचा विचार करता २०१९ या आर्थिक वर्षामधील आकडेवारीचा विचार केल्यास भारताचा यामध्ये पाचवा क्रमांक लागतो. पहिला क्रमांक अर्थातच महासत्ता असलेल्या अमेरिकेचा. दुसरा ब्राझिलचा, तिसरा युरोपिअन युनियनचा, चौथा चीनचा आणि त्या खालोखाल भारताचा. अंडी उत्पादनातही असेच चित्र आहे. अंड्यांच्या उत्पादनात चीन हा महासत्ता होऊ पाहणारा (शेजारील कुरापतखोर देश) प्रथम स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानी अमेरिका तर, भारत तिसऱ्या स्थानावर आहे. म्हणजेच भारत अजूनही प्रोटीन डेफिसिट (खाण्यामध्ये प्रथिनांची कमतरता) असलेल्यांच्या यादीतच आहे. त्यामुळेच देशाला आरोग्यपूर्ण आणि सक्षम करण्यासाठी पोल्ट्री व्यवसायातील गुंतवणूक वाढणे आवश्यक आहे.

Advertisement

एकूण देशांतर्गत अंडी उत्पादनाच्या ६० टक्के वाटा फ़क़्त पाच राज्यांचा आहे. आंध्रप्रदेश, तामिळनाडू, महाराष्ट्र, कर्नाटक आणि पश्चिम बंगाल ही ती महत्वाची मोठी राज्ये आहेत. महाराष्ट्राची लोकसंख्या आणि अंड्यांची मागणी लक्षात घेता दक्षिण भारतीय राज्ये आपल्याकडे मोठ्या प्रमाणात अंडी पुरवठा करतात. तर, आता सध्या अनेक कंपन्या करार पद्धतीने मांसल कोंबडीपालन करवून घेत आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र राज्य प्रथम स्थानावर आहे. एकूण देशांतर्गत चिकन उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा १६ टक्के आहे. त्याखालोखाल हरियाना, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आंध्रप्रदेश अशा राज्यांचा क्रम लागतो. तरीही महाराष्ट्र राज्याला यामध्ये आणखी मोठा स्कोप आहे.

Advertisement

देशातील मध्यभागी असलेले राज्य आणि वाहतुकीसाठीच्या सुविधा यामुळे महाराष्ट्र राज्य पोल्ट्रीचे आगार बनले आहे. आतापर्यंत पश्चिम महाराष्ट्र व खानदेशात वाढत असलेला पोल्ट्री व्यवसाय आता मराठवाडा आणि विदर्भातही रुजत आहे. त्यामुळे भविष्यात महाराष्ट्राचा या सेक्टरमध्ये असलेला टक्का २५ च्याही पुढे सहजपणे जाईल असे दिसते. सकस आहाराचे महत्व आणि पोल्ट्री व्यवसायाबाबत असलेले संशय दूर करण्यासाठी मात्र, आपल्याला त्यासाठी मोठे काम करावे लागणार आहे.

Loading...
Advertisement

(क्रमशः)

Advertisement

लेखन व संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

वाचक बंधू-भगिनींनो, आपण ‘कृषीरंग’वर दररोज कुक्कुटपालन अर्थात पोल्ट्री फार्मिंग (Poultry Farming) या विषयावरील माहितीची मालिका प्रसिद्ध करणार आहोत. यामध्ये महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थितीसह जगभरातील पोल्ट्री फार्मिंग ट्रेंड आणि संशोधन याबाबतची माहिती आपण घेणार आहोत. सध्या या व्यवसायाला ‘अच्छे दिन’ आल्याच्या बातम्या माध्यमांतून येतात. अशावेळी या व्यवसायाचे वास्तव आणि व्यावहारिक भान देण्याचा हा प्रयत्न आहे. आपणास कोणत्याही सूचना व मार्गदर्शन करावेसे वाटल्यास krushirang@gmail.com या इमेलद्वारे आपण आम्हाला संपर्क करू शकता. तसेच नियमित बातम्यांचे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय न्यूज अपडेट आणि कृषी-ग्रामीण विकासाची माहिती पाहण्यासाठी आमचे www.facebook.com/Krushirang (कृषीरंग) हे फेसबुक पेज लाईक व फॉलो करा. ही माहिती आवडल्यास इतर शेतकऱ्यांना माहितीसाठी शेअर करा. @टीम कृषीरंग

Advertisement

Advertisement

Leave a Reply