Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

पंकजा मुंडेंना झटका; ‘त्या’ माजी आमदारांनी गाठले महाविकास आघाडीचे व्यासपीठ..!

बीड / औरंगाबाद :

Advertisement

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना मंत्री धनंजय मुंडे यांनी एक झटका दिला आहे. त्याला निमित्त ठरले आहे ते बीड जिल्हा बँक निवडणुकीचे. कारण, या निवडणुकीच्या निमित्ताने पंकजा मुंडे यांचे समर्थक व निकटवर्तीय असे भाजपचे माजी आमदार केशव आधंळे  यांनी महाविकास आघाडीच्या बैठकीला हजेरी लावली आहे.

Advertisement

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या तोंडावर महाविकास अाघाडीच्या बैठकीला हजेरी लावून आंधळे यांनी आपण कोणत्या दिशेने जातोय हेच स्पष्ट केले आहे. तसेच त्यांनी म्हटले आहे की, जिल्हा बँकेच्या मागील संचालक मंडळाने केवळ बँकेचेच नाही तर बँकेच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे वाटोळे केले.

Advertisement

जिल्हा बँकेवर पंकजा मुंडे यांचा दबदबा आहे. त्यांच्या संचालक मंडळावरच आता आंधळे यांनी टीका केल्याने  भाजपला हादरा बसला आहे. आंधळे यांचे पुतणे अमोल आंधळे हे महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी विकास आघाडीचे उमेदवार आहेत.

Loading...
Advertisement

आंधळे यांनी चक्क महाविकास आघाडीच्या व्यासपीठावर हजेरी लावल्याने भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे. तसेच यानिमित्ताने लवकरच आंधळे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे.

Advertisement

बीडच्या राष्ट्रवादी भवनात गुरुवारी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बैठक आयोजित केली होती. त्यात आंधळे यांनी दणक्यात भाषण ठोकले. यावेळी माजी मंत्री आ.प्रकाश सोळंके, आमदार संजय दौंड, संदीप क्षीरसागर, बाळासाहेब आजबे, माजी आमदार अमरसिंह पंडित, अॅड.उषाताई दराडे, सय्यद सलिम, पृथ्वीराज साठे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित, ज्येष्ठ नेते डी. बी.बागल, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, गोविंदराव देशमुख, प्रा.सुशीलाताई मोराळे, शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, जि.प.गटनेते अजय मुंडे, कमलताई निंबाळकर, रेखाताई फड, काँग्रेसचे दादासाहेब मुंडे, रामकृष्ण बांगर, बन्सी सिरसाट, दत्ता पाटील, विलास सोनवणे, बहादूर पाटील, नंदकुमार मोराळे आदी दिग्गज मंडळी उपस्थिती होती.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

Advertisement

Leave a Reply