Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

शेतमाल वाहतूक अनुदान योजना सुरू; पहा कसा मिळणार 50 % अनुदानाचा लाभ ते

पुणे :

Advertisement

शेतमाल उत्पादन नी विक्री हे गणित वेगळे आणि महाकिचकट असते. अनेकदा पिकवणे तर शक्य होते, मात्र विकण्याची कला किंवा तितकी साधने नसतात. अशाच साधन नसलेल्या शेतकऱ्यांच्या शेतमालास परराज्यात बाजारपेठ उपलब्ध होण्याच्या उद्देशाने शेतमाल वाहतूक अनुदान योजना राबवण्यात येते.

Advertisement

कृषी पणन मंडळाचे सहायक सरव्यवस्थापक मंगेश कदम (देशांतर्गत व्यापार विकास विभाग) यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी या योजनेचा लाभ कसा घ्यावा आणि पात्र लाभार्थी कोण असू शकतात याचीही माहिती दिली आहे.

Advertisement

शेतमाल वाहतून अनुदान योजनाचे मुद्दे असे :

Loading...
Advertisement
  1. कृषी पणन मंडळातर्फे वाहतूक भाड्यात 50 टक्के अनुदान योजना
  2. विविध प्रकारचा नाशवंत शेतमाल विविध राज्यांमध्ये पाठवण्यास प्रोत्साहन देण्यासाठीची योजना
  3. राज्यातील शेतकऱ्यांची ही अडचण लक्षात घेत कृषी पणन मंडळातर्फे सुरू केलेली योजना
  4. नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपन्या व शेतमाल उत्पादकांच्या सहकारी संस्थांना मिळते अनुदान
  5. योजना आंबा, केळी, डाळिंब, द्राक्षे, संत्रा, मोसंबी, कांदा, टोमॅटो, आले व भाजीपाला या नाशवंत पिकांसाठीच लागू
  6. नमूद नसलेला नाशवंत शेतमाल असल्यास पूर्वमान्यता घेणे आवश्यक
  7. भुसार किंवा नाशवंत नसलेल्या शेतमालाच्या वाहतुकीसाठी अनुदान नाही
  8. महाराष्ट्रातून रस्ते वाहतुकीद्वारे परराज्यात शेतमाल वाहतूक करून प्रत्यक्ष विक्री करण्यात येणाऱ्या व्यवहारासाठी योजना लागू 
  9. योजनेतून 20 हजार ते 75 हजार रुपये अनुदान मिळते
  10.  व्यतिगत शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. त्यासाठी कंपनी किंवा संस्था असावी. तसेच प्रस्ताव त्याच नोंदणीकृत संस्था व कंपनीच्या नावे असावा.

अधिक माहितीसाठी आणि अर्ज डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर जाऊन पुढे जावे :

Advertisement

www.msamb.com/Documents/148542d1-9c43-400b-a7a0-cae48b222ac2.pdf

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

Advertisement

Leave a Reply