Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

दुर्दैवी बातमी : म्हणून त्यांना फिरवावा लागला उभ्या केळी पिकावर नांगर..!

अहमदनगर :

Advertisement

केळी म्हणजे नगदी पिक. या पिकातून कुटुंबाला अच्छे दिन येतील असे स्वप्न पाहून शेतकऱ्यांनी केळी लागवड केली. मात्र, विषाणूजन्य रोगाचा फेरा यां केळीला पडला आणि उभे ककेळी पिक ट्रॅक्टरने नांगारण्याची दुर्दैवी वेळ शेतकऱ्यांवर ओढवली आहे. ही घटना आहे श्रीरामपूर तालुक्यातील.

Advertisement

महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग व राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील तज्ञांनी या केळीवरील व्हायरसचे नमुने घेतले आहेत. श्रीरामपूर तालुक्यातील केळी पिकांवर सीएमव्ही (कुकुंबर) या व्हायरसचा प्रादुर्भावाचा अंदाज आहे. मात्र, तत्पूर्वीच पिक हातचे जाताना पाहून शेतकऱ्यांनी त्यावर ट्रॅक्टर फिरवण्यास सुरुवात केली आहे.

Advertisement

दादासाहेब आसने या शेतकऱ्यांनी याबाबत म्हटले आहे की, कांदा, मका व ऊस लागवड करून किमान काहीतरी पैसे मिळाले तरी असते. मात्र, केळीचा नाद केला आणि त्यात फसलो. लाखो रुपये खर्च करून हाती काहीच लागले नाही. म्हणून केळी पिकांवर नांगर फिरवला.

Advertisement

तालुका कृषी अधिकारी अशोक साळी, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे डॉ. भालेराव, पंचायत समितीचे कडलग, विस्तार अधिकारी पावसे यांनी या शेतीची पाहणी केली होती. रोगाचा प्रादुर्भाव होऊन वाढ खुंटली आहे. केळीची पाने पिवळी पडणे, झाड जळून जाणे, वाढ खुंटणे आदी लक्षणे दिसली.

Loading...
Advertisement

औषधे मारूनही व्हायरस आटोक्यात न आल्याने मोठे नुकसान झाले आहे. संबंधित शेतकऱ्यांनी मग हे टोकाचे पाउल उचलले आहे. अनेक कंपन्या आणि कृषी सेवा केंद्र चालकांनी हा रोग आटोक्यात आणण्याचा दावा करून औषधे दिली. मात्र, त्याचे काहीही सकारात्मक फलित दिसले नाही.

Advertisement

माळवाडगाव, मुठेवाडगाव परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी मोठा खर्च करून केळी पिकाची लागवड केली. मात्र, त्यांच्यावर असे दुर्दैवाचे दशावतार पहायची वेळ आलेली आहे. केळी लागवडीसाठी मशागत, लागवड, ठिबक, खते, किटकनाशके मिळून एकरी एक लाख रुपये खर्च करूनही हाती काहीही आलेच नाही. उलट ट्रॅक्टर फिरवण्याचा जास्तीचा खर्च या अभाग्या शेतकऱ्यांना करावा लागला आहे.

Advertisement

संपादन : विनोद सूर्यवंशी  

Advertisement

ता. क. आपल्या भागातील अशाच शेतीकथा, शेतीव्यथा, यशकथा, शेतीचे प्रश्न, प्रयोग आणि कृषी व ग्रामीण विकासाच्या बातम्या, व्हिडिओ आणि लेख आपण krushirang@gmail.com या ईमेलवर पाठवून द्या. संबंधित शेतकरी, लेखक व व्हिडिओग्राफर यांच्या नाव व पत्त्यासह त्यास आम्ही ठळक प्रसिद्धी देऊ.

Advertisement

Advertisement

Leave a Reply