Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

वाव.. त्याचा जन्मच झाला करोना कवचकुंडलासह; पहा कुठे घडला हा अद्भुत चमत्कार..!

निसर्गाची किमया महान आहे. त्याचाच प्रत्यय अमेरिकेतील एका आईला आलेला आहे. तिला जन्मलेले बाळ चक्क करोना कवचकुंडलासह या जगामध्ये दाखल झालेले आहे. अनेकांना या अद्भुत गोष्टीने आनंदाचा धक्का दिला आहे.

Advertisement

या बळाचा जन्म झाला आहे अमेरिकेतील फ्लोरिडात. जन्मताच रक्तामध्ये कोरोनाशी लढणाऱ्या अँटिबॉडीज (प्रतिपिंडे) असलेले जगातील पहिले मूल म्हणून त्याची आता ओळख बनली आहे. अभ्यासक पॉल गिल्बर्ट आणि चेड रुडनिक यांनी यास दुजोरा दिला आहे.

Advertisement

यामुळे कोरोनाच्या महामारीत लढणाऱ्या अमेरिका आणि अवघ्या जगाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. नवजात बालकाच्या रक्तामध्ये कोरोनाशी लढणाऱ्या या अँटिबॉडीज आढळण्याची ही पहिलीच घटना आहे. फ्लोरिडा अटलांटिक विद्यापीठातील तज्ज्ञांनी हे मूल जन्मताच त्यांच्या नाळेतील रक्ताची तपासणी केल्यावर हा प्रकार पुढे आलेला आहे.

Advertisement

तीन आठवडे अगोदर मातेला कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस देण्यात आलेला होता. २८ दिवसांनी दुसरा डोस देण्यात येतो. तोवर मुलगी जन्माला आली. मातेने बाळाला सतत स्तनपान दिले आहे. आता या मुलीस अँटिबॉडीज (प्रतिपिंडे) असल्याचे स्पष्ट झालेले आहे.

Loading...
Advertisement

मात्र, तरीही या अँटिबॉडीज (प्रतिपिंडे) किती प्रभावी आहेत, आणि बाळाचे या विषाणूपासून किती दिवस आणि कितपत प्रभावी असे संरक्षण करणार हे संशोधनानंतर स्पष्ट होणार आहे. मात्र, एकूण मेडिकल विज्ञानाच्या जगात या घटनेला मोठे महत्व आहे.

Advertisement

बाळाच्या रक्तामध्ये सापडलेल्या अँटिबाॅडीज त्याला कोरोनापासून सुरक्षित ठेवण्यात किती परिणामकारक ठरतील हे तपासण्यासाठी डॉक्टरांनी कोरोना लस घेतलेल्या महिला आणि त्यांच्या पोटी जन्मलेल्या बाळांच्या आरोग्याविषयी पूर्ण नोंदी ठेवण्यास सुरुवात केली आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

Advertisement

Leave a Reply