Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

असे आहे MPSC परीक्षेचे नियोजन; करोनाच्या पार्श्वभूमीवर पहा काय काळजी घेतली जाणार ते

मुंबई :

Advertisement

नाय-होय करता आता महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा 21 मार्च रोजी होत आहे. राज्यभरात ८०० परीक्षा केंद्रांवर अडीच लाख विद्यार्थी परीक्षा देणार असून त्यासाठी २० हजार कर्मचारी नियुक्त केले आहेत. त्यांच्या आरोग्याच्या काळजीचे मोठे आव्हान आयोगासमोर आहे.

Advertisement

ही परीक्षा घेताना काळजीपोटी प्रशासनाने घेतलेल्या खबरदारीचे मुद्दे असे :

Advertisement
  • पर्यवेक्षकांना पीपीई किट देण्यात येणार
  • कर्मचाऱ्यांबरोबरच विद्यार्थ्यांना मिनी पीपीई किट म्हणजे हँड ग्लोव्हज, मास्क दिले जाणार
  • केंद्रावर नियुक्त प्रत्येकाची आरटीपीसीआर तपासणी करण्यात येणार आहे
  • सर्वांची योग्य काळजी घेऊन ही परीक्षा पूर्ण करण्यासाठीचे प्रयत्न आहेत
  • सर्व नियम आणि सूचना यांचे परीक्षार्थी व कर्मचाऱ्यांनी पालन करून सर्वांना सहकार्य करायचे आहे.

१४ मार्च रोजी होणारी राज्यसेवेची परीक्षा रद्द झाल्यानंतर राज्यभरात विद्यार्थ्यांच्या संतापाचा कडेलोट झाला होता. विद्यार्थी थेट रस्त्यांवर उतरल्याने महाविकास आघाडी सरकारपुढे मोठे संकट उभे ठाकले होते.

Loading...
Advertisement

अखेरीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच यात हस्तक्षेप करून २ दिवसात परीक्षेची नवी तारीख जाहीर करावी लागली होती. आता २१ मार्च रोजी ही परीक्षा होत आहे. त्यासाठी आयोगाकडून प्रत्येक केंद्रावर विशेष नियोजन करण्यात आले आहे. परीक्षार्थी, पर्यवेक्षक, शिपाई यांनाही मिनी पीपीई किट देण्यात येणार आहेत. 

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

Advertisement

Leave a Reply