Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

हिटमॅन रोहित शर्माने केला ‘तो’ महत्वाचा विक्रम; कोहलीनंतर ठरला दुसराच खेळाडू..!

मुंबई :

Advertisement

भारताचा हिटमॅन रोहित शर्मा हा इंग्लंडविरुध्दच्या चौथ्या टी २० सामन्यात केवळ १२ धावांवर बाद झाला. मात्र बाद झाल्यावरही त्याने एक विक्रम आपल्या नावे केला आहे. आणि असा विक्रम करणारा तो विराट कोहलीनंतर दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे.

Advertisement

भारत आणि इंग्लंड यांच्यात अहमदाबाद येथे खेळलेल्या मालिकेच्या चौथ्या टी २० सामन्यात रोहित शर्मा पुन्हा एकदा अपयशी ठरला. पण बाद होण्यापूर्वी टीम इंडियाच्या ‘हिटमन’ने फलंदाजीतील एक माईलस्टोन गाठला आहे.

Advertisement

रोहित शर्माने या टी २० सामन्यात १२ चेंडूत १२ धावा केल्या. या दरम्यान त्याने १ चौकार आणि १ षटकार लगावला. त्याला जोफ्रा आर्चरने झेलबाद केले. या छोट्या खेळीदरम्यान रोहितने टी २० क्रिकेटमध्ये ९ हजार धावाही पूर्ण केल्या. हा टप्पा गाठणारा विराट कोहलीनंतरचा तो दुसरा भारतीय फलंदाज आहे. मागील वर्षी टी २० मध्ये विराटने ९ हजार धावांचा आकडा गाठला होता.

Loading...
Advertisement

रोहित शर्माने आपल्या कारकीर्दीतील ३४२ व्या टी २० सामन्यातील ३२९ वा डाव खेळत हा विक्रम गाठला आहे. रोहितने आपल्या अकरा धावा पूर्ण होताच तो ९ हजार धावा पूर्ण करणारा दुसरा भारतीय आणि जगातील ९ वा खेळाडू ठरला आहे. त्याच्या आधी ख्रिस गेल, किरोन पोलार्ड, शोएब मलिक, ब्रेंडन मॅक्युलम, डेव्हिड वॉर्नर, ॲरॉन फिंच आणि विराट कोहली यांनी असा पराक्रम केला आहे. 

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

Advertisement

Leave a Reply