Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकत सुर्यकुमार यादवचा टी २० मध्ये धुमाकुळ.!

भारताच्या टी २० संघात ज्या खेळाडूचा समावेश करण्यात यावा, अशी चर्चा व मागणी गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होती त्या सुर्यकुमार यादवने आपल्या पहिल्याच टी २० सामन्यात पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकत दमदार पदार्पण केले आहे. यादवने या सामन्यात अर्धशतकही झळकावले आहे. त्यामुळे पहिल्याच सामन्यात पहिल्याच चेंडूवर षटकार आणि अर्धशतक अशी दुहेरी कामगिरी यादवने केली आहे.

Advertisement

स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने गुरुवारी इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टी -२० सामन्यात पहिले टी २० आंतरराष्ट्रीय अर्धशतक झळकावले. आपला पहिला सामना खेळत सूर्यकुमारने षटकार खेचून डाव सुरू केला. त्याचबरोबर त्याने २८ चेंडूत चौकारांसह अर्धशतकही पूर्ण केले. या दरम्यान त्याने ६ चौकार आणि २ षटकार लगावले.

Advertisement

चौदाव्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर सॅम करणने त्याला डेव्हिड मालनद्वारे झेलबाद केले. पण मालनच्या या झेलमुळे वादाला तोंड फुटले असून तिसऱ्या अंपायरच्या निर्णयामुळे वीरेंद्र सेहवाग, वसीम जाफरसह अनेक माजी क्रिकेटपटूंनी या झेलबाबत प्रश्न निर्माण केले आहेत. रीप्लेमध्ये असे वाटत होते की चेंडू मालनच्या हातावरुन जमिनीवर आदळला आहे. परंतु मैदानावरील पंचांकडून सॉफ्ट सिग्नल देण्यात आला. त्यानंतर हे प्रकरण तिसऱ्या पंचांपर्यंत पोहोचले. तिसऱ्या पंचानं इंग्लंडच्या टीमच्या बाजूने हा निर्णय दिला. पंचांच्या या वादग्रस्त निर्णयामुळे सूर्यकुमारला परत जावे लागले.

Loading...
Advertisement

सूर्यकुमारने ३१ चेंडूंत ६ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ५७ धावांची शानदार खेळी खेळली. आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत पहिल्या चेंडूवर षटकार मारणारा सूर्यकुमार यादव जगातील पाचवा खेळाडू ठरला आहे. यासह तो पहिल्या आंतरराष्ट्रीय डावात अर्धशतक ठोकणारा तिसरा फलंदाज ठरला आहे. त्याच्या अगोदर अजिंक्य रहाणे आणि ईशान किशन यांनी हा पराक्रम केला आहे. रहाणे आणि किशनने आपल्या पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावात हा पराक्रम केला आहे. 

Advertisement

Advertisement

Leave a Reply