Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

खासदार केतकरांनी केली महत्वाची मागणी; वाझे प्रकरणात आता जिलेटीनच्या कंपनीची एन्ट्री..!

मुंबई :

Advertisement

मुंबई पोलीस आणि अवघ्या देशापुढे प्रश्न बनलेल्या पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या प्रकरणामध्ये आता आणखी एक नवा ट्विस्ट आलेला आहे. तो आणला आहे काँग्रेस पक्षाचे राज्यसभा खासदार आणि ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी..!

Advertisement

होय, त्यांनी या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांच्या तपासात आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या आरोपात न आलेला मुद्दा पुढे आणला आहे. राज्यसभेत त्यांनी यावर बोलताना जिलेटीनच्या कंपनीवर फोकस केंद्रित करण्याची महत्वाची मागणी केली आहे.

Advertisement

केतकर यांनी म्हटले आहे की, राष्ट्रीय तपास संस्था ही मुंबईच्या प्रकरणाचा चांगला तपास करीत आहे. मात्र, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेल्या कारमध्ये ज्या कंपनीचे जिलेटीन होते त्यावर अजूनही लक्ष गेलेले नाही.

Loading...
Advertisement

हे जिलेटीन नागपूर येथील कंपनीचे असून विश्व हिंदू परिषदेशी निगडीत व्यक्तीची ही कंपनी आहे. त्यांनी राम मंदिरास 15 कोटी इतकी मोठी देणगी दिलेली आहे. त्यामुळे जिलेटीन नेमके कोणी पुरवले आणि त्यात हेतू कोणता होता? याची चौकशी होण्याची गरज असल्याचे केतकर यांनी म्हटले आहे.

Advertisement

केतकर यांनी अंबानी यांच्या घराजवळील कारच्या प्रकरणासह खासदार मोहन डेलकर यांनी केलेल्या आत्महत्येचा मुद्दाही मांडला. त्यांनी म्हटले की, डेलकर हे 7 वेळा खासदार राहिले आहेत. त्यांची सुसाईड नोट सापडली आहे. त्यावरून सखोल तपास होण्याची आवश्यकता असल्याचे केतकर यांनी म्हंटले आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

Advertisement

Leave a Reply