Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ मुद्द्यांवर दरेकरांनी केली ठाकरे सरकारवर टीका; पहा नेमके काय म्हटलेत त्यांनी

मुंबई :

Advertisement

सचिन वाझे यांच्या अंबानी स्फोटक प्रकरणातील सहभागामुळे पोलीस दलात मोठे फेरबदल करण्याची नामुष्की ठाकरे सरकारवर आली आहे. ठाकरे सरकारने पोलिस दलात बदलांचा बाजार मांडला आहे, अशी टिका विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली.

Advertisement

पोलिस दलात होणाऱ्या बदली संदर्भात संजय पांडे प्रचंड नाराज आहेत. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. या पत्रात संजय पांडे यांनी नेहमी आपल्यावर अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली आहे. आपली क्षमता असूनही दरवेळी आपल्याला साईडलाईन करण्यात आले. कुवत असतानाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालकपद आपल्याला मिळाले नाही. आज दस्तुरखुद्द आयपीएस अधिकारी संजय पांडे अगदी उद्विकतेने सांगतो माझ्यावर अन्याय झाला आहे. अशा प्रकारची भूमिका आयपीएस अधीकारी पत्राद्वारे करत असेल यापेक्षा गंभीर काहीच असु शकत नाही, असे दरेकर यांनी सांगितले.

Loading...
Advertisement

मुंबई पोलीस आयुक्त पदी हेमंत नगराळे यांची नि.क्ती करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त पदचा पदभार स्विकारल्या नतंर हेमंत नगराळे यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलले की पोलिस दलाची प्रतिमा मलीन झाली  असुन पुनः गतवैभवाचे दिवस आणायचे आहेत. पोलिसांनी गुन्हेगारी करता कामा नये. या संदर्भात दरेकर म्हणाले की, राज्यसरकारला गृहखातं सांभाळण्यात अपयश आले आहे. पोलीस खात्यात कोणाचा कोणाला मेळ नाही, नियंत्रण नाही आणि त्यातून अशा प्रकारचे वाझे तयार होतात आणि उद्वीगतेने संजय पाटील यांची स्टेटमेंट येते. गृहखात्यांचा व कायदा सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे, असा आरोप दरेकर यांनी केला.

Advertisement

राज्यात ठाकरे सरकार आल्यानतंर कॉरंटाईन सेंटर पासून हॉस्पिटल मध्ये बलात्कार, विनयभंगाचे प्रकार घडले. महिलांवर अत्याचार राज्यात मोठ्या प्रमाणावर होत आहे. खून, दरोडे होत आहे. वाझे सारखा खाकी वर्दी माणूस अनेक प्रकरणात समावेश आहे. या सरकर मध्ये कोणतेही नियत्रणा नसुन पोलिस दलाचे बदनामी झाली असुन याला सर्वस्वी राज्यसरकार जबाबदार आहे असे प्रविण दरेकर यांनी सांगितले.

Advertisement

Advertisement

Leave a Reply