Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

गडकरींनी केली ‘टोलमुक्त भारता’ची घोषणा; पहा नेमका काय प्लॅन आहे केंद्राचा

मुंबई :

Advertisement

सध्या देशभरात कुठेही प्रवास करताना आपल्या गाडीसमवेत आणखी एक घटक जोडलेला असतो तो म्हणजे टोल. होय, टोल देऊन चांगल्या रस्त्यावरून प्रवास करावा लागतो. त्यासाठी FasTag किंवा कॅश पैसे मोजावे लागतात. मात्र, अवघा भारत टोलमुक्त करण्याचा प्लॅन केंद्र सरकारने तयार केला आहे.

Advertisement

वाहनांच्या वाहतुकीसाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी 18 मार्च रोजी संसदेत सांगितले की, पुढील एका वर्षाच्याआत भारत टोलच्या अडथळ्यांपासून मुक्त होईल. म्हणजेच, एका वर्षात देश टोल फ्री होईल.

Advertisement

ते म्हणाले की, यावेळी फेस्टॅगची पूर्ण अंमलबजावणी होईल. आता गाड्यामध्ये ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम (जीपीएस) बसविण्यात येणार आहे. ज्याच्या मदतीने टोल शुल्क भरता येईल. जे गाड्यांमध्ये FasTag लावणार नाहीत त्यांना टोल चोर समजण्यासह त्यांनी जीएसटी चोरी केल्याचेही प्रकरण दाखल केले जाईल.

Advertisement

गडकरी यांनी गुरुवारी सांगितले की, सध्या देशातील जवळपास 93 टक्के वाहने FasTag च्या माध्यमातून टोल भरत आहेत. परंतु अद्याप 7 टक्क्यांनी ही प्रणाली घेतलेली नाही. त्यामुळे FasTag च्या नसल्यास टोल दुप्पट करण्यात आला आहे. आता टोल बूथ हटवण्याचे काम एका वर्षात पूर्ण होईल.

Loading...
Advertisement

त्यांनी टोल प्रणालीत त्रुटी असल्याचेही काबुल केले. ते म्हणाले की, आता गाडीमध्ये जीपीएस सिस्टम बसविण्यात येतील. ज्याच्या मदतीने टोल शुल्क भरता येईल आणि त्यानंतर अशा टोल बूथची गरज भासणार नाही.

Advertisement

गडकरी म्हणाले की, रायपूर ते विशाखापट्टणम दरम्यानचा हरित महामार्ग मंजूर झाला आहे. याचे काम सुरू झाले आहे. हे काम जवळपास दीड वर्षात पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. याचा फायदा अनेक राज्यांतील लोकांना होणार आहे.

Advertisement

दुसर्‍या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की, 90 टक्के जमीन अधिग्रहण केल्याशिवाय सरकार प्रकल्प सुरू करोत नाही. जमीन ताब्यात घेतल्यानंतर, सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला जातो. रस्ता अपघात रोखणे ही प्राथमिकता आहे. करोनापेक्षाही रस्ते अपघातात अधिक लोकांचा मृत्यू होतो. भारत जगातील सर्वात मोठा ऑटोमोबाईल हब होईल.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

Advertisement

Leave a Reply