Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

शीतयुद्ध : बायडेन यांनी वाढवला तणाव; पुतीन यांना म्हटले ‘हत्यारा’, पहा काय उद्भवलीय परिस्थिती

अमेरिका आणि रशिया हे जागतिक राजकारणातील दोन महत्वाचे देश आहेत. महासत्ता असलेल्या अमेरिकेला शह देण्याची ताकद सध्यातरी फ़क़्त चीन व रशिया या फ़क़्त दोनच देशांमध्ये असल्याचे म्हटले जाते. त्यातील रशियाशी दोन हात करण्याची तयारी अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी दर्शवली आहे. परिणामी जगभरात तणाव निर्माण झाला आहे.

Advertisement

बिडेन यांनी सत्ता स्वीकारल्यानंतर अमेरिकेचा प्रतिस्पर्धी असेलल्या रशियाबरोबर तणाव वाढतच आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिडेन यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना थेट ‘मारेकरी’ म्हटले आहे. तसेच त्यांनी पुढे म्हटले आहे की, ‘त्यांना याची किंमत मोजावी लागेल’. दुसरीकडे या इशाऱ्याने संतप्त झालेल्या रशियाने आपला राजदूत माघार बोलावला आहे. त्यामुळे जगात पुन्हा एकदा शीतयुद्ध सुरू होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Advertisement

संरक्षण आणि सामरिक क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, येणारी वर्षे जगासाठी खूपच आव्हानात्मक असतील. अशावेळी शीतयुद्धाचा धोका अगदी वास्तविक वाटतो असेच अनेकांनी म्हटले आहे.

Advertisement

परराष्ट्र व्यवहारांचे तज्ज्ञ डॉ. रहिससिंग यांनी नवभारत टाईम्स यांना म्हटले आहे की, ओबामा यांच्या काळातही क्रीमिया घोटाळ्यानंतर अमेरिकेर अशीच परिस्थिती झाली होती. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आगमनानंतर त्यांनी रशिया सोसून चीनला अडचणीत आणण्यास सुरुवात केली होती. मात्र, आता बिडेन हे ओबामाच्या काळात परत येत आहेत.

Loading...
Advertisement

डॉ. सिंह म्हणतात की, आता जुने शीतयुद्ध होणार नाही. जगात फ़क़्त एकच महासत्ता आहे असे म्हटले जात नाही. सबप्राईम क्राईसेस झाल्यावर महासत्ता अमेरिकेला झटका बसला आहे. त्यामुळे चीन आणि रशिया ही इतर दोन सत्ताकेंद्र बनली आहेत. आता शीतयुद्ध सुरू झाले तर त्याचे रूप पूर्वीपेक्षा वेगळे म्हणजे तिरंगी असेल.

Advertisement

जर मॉस्को आणि वॉशिंग्टनमध्ये संघर्ष असेल तर मॉस्को आणि बीजिंग यांच्यात मैत्री वाढेल. हे केवळ अमेरिकेसाठीच नव्हे तर इंडो-पॅसिफिक प्रदेश आणि जगासाठीदेखील अत्यंत आव्हानात्मक असेल. बायडेन यांची ही मोठी चूक ठरेल. रशिया आणि चीनमधील मैत्री वाढल्यास ते अमेरिकेवर हल्ला करणार नाहीत. मात्र, जपान, ऑस्ट्रेलिया आणि इस्त्राईलसारख्या देशांना याचा थेट त्रास होईल. काही छोटे हल्ले केले जातील. जगभरात तणाव वाढेल. लवकरच लहान युद्धे होऊन त्यात तिसर्‍या देशांना लक्ष्य केले जाईल असेही डॉ. सिंह यांना वाटते.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

Advertisement

Leave a Reply