Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

घरीच बनवा आरोग्यसंपन्न दही; वाचा बनवण्याची पद्धत व पोषक घटकांची माहिती

दही खाणे चांगले आहे, असे आपण नेहमीच म्हणतो. मात्र, एकूण भारतीयांच्या आहारातील दह्याचा टक्का लक्षात घेता ही फ़क़्त बोलाचीच कधी असल्याची साक्ष पटते. त्यामुळेच दही बनवणे आणि ते खाणे याबाबतची महत्वाची माहिती पाहणार आहोत.

Advertisement

मित्रांनो आणि मैत्रिणींनो, दही हा संतुलित आहारातील एक महत्वाचा घटक आहे. मात्र, मग बाजारात मिळणारे निकृष्ट आणि चवहीन (किंवा कृत्रिम चवदार) दही खाऊन आपल्या शरीराचे पोषण योग्य पद्धतीने होणार नाही. त्यासाठी चांगल्या दुधाचेच दही पाहिजे. त्यातच पशुपालाकांनी जर आपल्याच गोठ्यात चांगल्या दर्जाचे दही करून त्याची विक्री केली तर त्यातून अर्थार्जन होण्यासह भारतीयांना पोषक घटकायुक्त दही खायला (आणि प्यायलाही) मिळेल की.

Advertisement

आपण पाहूयात घराच्या घरी आरोग्यसंपन्न असे दही तयार कराच्या पद्धत. तर, असे दही तयार करण्यासाठी जुनी पद्धत वापरावी. विराजानापासून दही बनवण्यासाठी चौकोनी कुटुंबासाठी अर्धा लिटर दुध उकळू थंड करावे. एका भांड्यात दोन चमचे विरजण (अगोदरचे घट्ट दही) घेऊन ते भांड्याला तळाला सगळीकडे लावून घ्यावे. दुध बऱ्यापैकी कोमट झाल्यावर मग ते भांड्यात ओतून मग त्याला त्याच चमच्याने ढवळावे. विरजण सगळीकडे एकजीव झालेले असल्याचे लक्षात आल्यावर मग असे भांडे झाकण लावून अंधाऱ्या जागेवर ठेऊन द्यावे.

Loading...
Advertisement

असे भांडे रात्रभर तसेच बाहेर ठेऊन मगच फ्रीजमध्ये ठेवावे. अंधाऱ्या जागेत बाहेर किमान ६ तास असे भांडे अजिबात हलवू नये. त्यानंतर सकाळी दही तयार झाल्यावर फ्रीजमध्ये ठेऊन आपण ते २ दिवस वापरू शकतो. अशा पद्धतीने चांगल्या प्रतीच्या दुधाचे दही बनवून खा. आपल्या मुलांना व ज्येष्ठांनाही ते आहारामध्ये द्या. त्यामुळे निरोगी राहण्यास मदत होते.

Advertisement

संपादन व लेखन : माधुरी सचिन चोभे

Advertisement

Advertisement

Leave a Reply