Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

पोल्ट्री फार्मिग : व्यवसायाची आहे ‘अशी’ परिस्थिती; वाचा कुक्कुटपालनाची माहिती

सध्या गोट फार्मिंग आणि पोल्ट्री फार्मिंग (Poultry Farming) म्हणजे भरघोस पैसे कमावण्याचा राजमार्ग, अशाच बातम्या प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून येतात. अशावेळी बेरोजगारांना मग आपणही झटकन श्रीमंत होण्यासाठी असा व्यवसाय करावासा वाटणे साहजिक आहे. मात्र, आपली वैयक्तिक क्षमता (आर्थिक, सामाजिक, मानसिक व शारीरिक) लक्षात घेऊन अशा व्यवसायात उतरण्याचा निर्णय घ्यावा.

Advertisement

कोणताही व्यवसाय जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यशस्वी होतो. आता तर ब्रॉयलर कोंबड्यासह आरआयआर आणि काहीजण गावरान कोंबडीपालनातही मार्केटिंगची साखळी उभी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशावेळी आपली गुंतवणूक क्षमता आणि नफा-तोटा सहन करण्याची क्षमता लक्षात घेऊन आपण या व्यवसायाचे नियोजन करावे. ऑनलाइन पध्दतीची जोड देऊन यामध्ये काही करणे शक्य असल्यास तेही पाहावे. मात्र, आपल्याला ज्या विषयातले ज्ञान आहे किंवा आपण ते संपादित करू शकतो असा विश्वास आहे त्याच पद्धतीने यामध्ये डोके लावावे. (ज्ञान आणि माहिती यातील मुलभूत फरक लक्षात हेऊन याबाबतचे निर्णय घ्यावेत.)

Advertisement

परसातील कुक्कुटपालन (बॅकयार्ड पोल्ट्री Backyard Poultry) हा एक जोडधंदा आहे. ग्रामीण भागातील महिला यामध्ये खूप चांगले पैसे कमावतात. परंपरागत पद्धतीनेच तो केला जातो. मात्र, व्यवसाय म्हणून विचार करताना जोडधंदा हा शब्द बाजूला सारून मुख्य व्यवसाय म्हणूनच यामध्ये पडावे. कारण, शेती असो की शेती आधारित व्यवसाय असोत, त्यामधील गुंतवणूक मोठी असते. आपल्या आर्थिक क्षमतेनुसार आणि बँक किंवा अनुदान योजनेची जोड देऊन याबाबतीत निर्णय घ्यावा. यामध्ये कोट्यवधी रुपये कामावल्याच्या बातम्या आपण खुपदा वाचल्या असतील किंवा व्हिडिओ पाहिलेले असतील. माहिती घेण्यासाठी आणि व्यावसायिक ट्रेंड समजून घेण्यासाठी ते आवश्यक आहे. मात्र, त्याला भुलून यामध्ये लगेचच सोन्याचे अंडे देणारी कोंबडी हाती सापडेल असे स्वप्न मात्र ठेऊ नका. आपणास नकारात्मक ज्ञानाचा डोस देण्याचा हा प्रयत्न नाही.

Advertisement

कारण, यामध्ये कोट्यवधी गुंतवणूक करून कोट्याचे आकडे येणे स्वाभाविक आहे. किंवा इतर व्यवसायाचे पैसे यात वळवून त्याला सोन्याचा धंदा असल्याचे भासवणे वेगळे आहे. यामध्ये मोठ्या कंपन्यांनी सगळी साखळी उभा करून अब्जावधी रुपयेही कमावलेली उदाहरण आहेत. मात्र, आपली उत्पादन व मार्केटिंग यांची क्षमता लक्षात घेऊन आपण कोणत्या टप्प्यावर काम करू शकतो हे ठरवावे. करार पद्धतीने काम करणाऱ्या कंपन्यांमध्ये आपण उत्पादक म्हणून सहभागी होऊन हा व्यवसाय सुरू करण्याची संधी सर्वांना आहे. यामध्ये किलोनुसार कोंबड्यांचे संगोपन करण्यासाठीचे पैसे शेडवाल्या कुक्कुटपालक व्यावसायिकांना मिळतात. यामुळे रिस्क मॅनेजमेंट सहजशक्य होते.

Advertisement

यासह अनेकजण आता लेअर फार्मिंग (Layer Farming) अर्थात अंडी (Egg) उत्पादन यामध्येही काम करीत आहेत. मात्र, यात महत्वाची गोष्ट लक्षात घेण्याची आवश्यकता आहे ही अशी की अंडी उत्पादन यामध्ये सगळा धंदा पैशांवर आहे. अगदी १-२ पैशांवर याचे गणित अवलंबून असते. अशावेळी खाद्यावरील खर्च कमी ठेवण्यासह कोंबड्यांच्या आरोग्याची काळजी हा मुद्दाही दुर्लक्ष करून चालत नाही. मका आणि सोयाबीन यांच्या भावावर यातील नफ्या-तोट्याचे गणित ठरते. तसेच भारत हा मांसाहार प्रेमी देश नाही. अशावेळी महिने, सन व उत्सव यांची गोळाबेरीज लक्षात घेऊनही पोल्ट्री फार्मिंगचे गणित बसवावे लागते. एकूण वार्षिक उलाढाल लक्षात घेता हमखास नफा देणारा हा व्यवसाय आहे. मात्र, त्यासाठी आपण याचे सर्व शास्त्रीय आणि व्यावहारिक गणित समजून घेण्याची गरज आहे. तसेच ऑनलाईनच्या या जगात बाजारभाव आणि नवे संशोधन याचाही नियमित अभ्यास करावाच लागतो. हाच या व्यवसायाच्या यशाचा खरा राजमार्ग आहे.

Loading...
Advertisement

(क्रमशः)

Advertisement

संपादन व लेखन : सचिन मोहन चोभे

Advertisement

वाचक बंधू-भगिनींनो, आपण ‘कृषीरंग’वर दररोज कुक्कुटपालन अर्थात पोल्ट्री फार्मिंग (Poultry Farming) या विषयावरील माहितीची मालिका प्रसिद्ध करणार आहोत. यामध्ये महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थितीसह जगभरातील पोल्ट्री फार्मिंग ट्रेंड आणि संशोधन याबाबतची माहिती आपण घेणार आहोत. सध्या या व्यवसायाला ‘अच्छे दिन’ आल्याच्या बातम्या माध्यमांतून येतात. अशावेळी या व्यवसायाचे वास्तव आणि व्यावहारिक भान देण्याचा हा प्रयत्न आहे. आपणास कोणत्याही सूचना व मार्गदर्शन करावेसे वाटल्यास krushirang@gmail.com या इमेलद्वारे आपण आम्हाला संपर्क करू शकता. तसेच नियमित बातम्यांचे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय न्यूज अपडेट आणि कृषी-ग्रामीण विकासाची माहिती पाहण्यासाठी आमचे www.facebook.com/Krushirang (कृषीरंग) हे फेसबुक पेज लाईक व फॉलो करा. ही माहिती आवडल्यास इतर शेतकऱ्यांना माहितीसाठी शेअर करा. @टीम कृषीरंग

Advertisement

Advertisement

Leave a Reply