Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

IPO / शेअर अलर्ट : ३२० वरून १०२३ रुपयांचा केला उच्चांक आणि आता निघाली दिवाळखोरीत..!

सध्या शेअर बाजारात रॉबिनहूड इन्व्हेस्टर्स अर्थात नव्याने नशीब आजमावायला आलेल्या गुंतवणूकदार मंडळींची चालती आहे. करोना लॉकडाऊननंतर आपल्याकडे असेल-नसेल ती रक्कम त्यांनी बाजारात गुंतवली आहे. परिणामी अर्थव्यवस्था संकटात असताना शेअर बाजार जोमात आहे. त्याचवेळी नवीन आयपीओ दणक्यात येत आहेत. त्या सर्वांना अलर्ट देणारी ही बातमी आहे.

Advertisement

ही बातमी आहे मनपसंद बेव्हरेजेस या गुजराती कंपनीची. कंपनीचा आयपीओ आला होता  जून २०१५  मध्ये. तोही दणक्यात. कंपनीने ३२० रु. प्रति शेअर मूल्य निश्चित केल्यावर अनेकांनी त्याला अफाट प्रतिसाद देऊन १.४ पट रकमेने मागणी नोंदवली. लिस्टिंग  झाल्यानंतर १५ डिसेंबर २०१७ रोजी मनपसंद बेव्हरेजेसच्या शेअरने १,०२३.६५ रुपयांची उच्च पातळी गाठली होती.

Advertisement

मात्र, मग ग्रह फिरले. वास्तव दिसायला लागले आणि आता ही कंपनी शेअर बाजारातून नाही, तर थेट पटलावरून गायब होत आहे. त्याला निमित्त ठरले ते कंपनीवर ४० कोटी रुपयांच्या जीएसटी चोरीचे. या आरोपानंतर व एमडी अभिषेक सिंह आणि सीएफओ परेश ठक्कर यांना अटक झाली.

Advertisement

कंपनी चेअरमन धीरेंद्र सिंह यांनी कर्ज घेऊन जीएसटीची थकीत रक्कम भरण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्यानंतर कंपनीच्या शेअरमध्ये घसरण सुरू झाली आणि मग डबघाईला आली. २९ जून २०२० रोजी हा शेअर ६.१४ रु. झाला आणि तेव्हापासून ट्रेडिंग बंद आहे.

Loading...
Advertisement

ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत मनपसंद बेव्हरेजेसने केवळ ४ लाख रुपयांची विक्री केली. डिसेंबर तिमाहीत कंपनीला २६.६७ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. परिणामी नॅशनल कंपनी लॉ ट्राब्युनलच्या (एनसीएलटी) अहमदाबाद पीठाने मनपसंद बेव्हरेजेससाठी अर्पण महेशकुमार शाहना अंतरिम रिझॉल्युशन प्रोफेशनल (आयआरपी) नियुक्त केले आहे.

Advertisement

*(स्त्रोत : दिव्य मराठी)

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

Advertisement

Leave a Reply