Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

प्रांतांनी थेट तीन तलाठ्यांनाच बदडले; संघटना झाली आक्रमक

सांगली / कोल्हापूर :

Advertisement

महसूल विभाग म्हणजे कामापेक्षा इतर मुद्द्यांवर चर्चेत राहणारा विभाग. कारण, इथे नागरिकांची कामे होण्यापेक्षा अडकून ठेवण्याची स्पर्धा असते. मात्र, आता सांगली जिल्ह्यातील एका धक्कादायक प्रकरणाने हा विभाग चर्चेत आलेला आहे. कारण, एका प्रांताधिकारी महोदयांनी चक्क तिघा तलाठ्यांना बेदम मारहाण केली आहे.

Advertisement

तलाठी संघटना याप्रकरणी आक्रमक झाली आहे. त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, सोमवारी सायंकाळी प्रांताधिकारी नागेश पाटील यांनी तलाठी अविनाश पाटील, अमर साळुंखे व महादेव वंजारी या तिघांना फोन करून बोलावून घेतले. साहेबांच्या सुचानेनुसार तिघेही कार्यालयात पोहोचले.

Loading...
Advertisement

प्रांत कार्यालयात पाटील यांनी या तिघांना त्यांच्या दालनात बोलावून घेतले. त्यानंतर अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, असे निवेदनात म्हटले आहे. मात्र, यातील मुख्य मुद्द्यावर कोणीही बोललेले नाही. तो मुद्दा म्हणजे प्रांत साहेबांनी नेमक्या कोणत्या मुद्द्यावर तलाठी कर्मचाऱ्यांना मारहाण केली आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

Advertisement

Leave a Reply