Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

औरंगाबादच्या कर्फ्यू नियमात बदल; पहा कोणत्या बदलाकडे द्यायचे आहे सर्वांनी लक्ष

औरंगाबाद :

Advertisement

वाढत्या करोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर सध्या औरंगाबाद शहरात नाईट कर्फ्यू आहे. या कर्फ्यू नियमात काही महत्वाचे बदल करण्यात आलेले आहेत. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी याची माहिती दिली आहे.

Advertisement

19 मार्चपासून नवीन नियम लागू होणार ते असे :

Advertisement

रात्रीच्या संचारबंदीच्या नियमांमध्ये केवळ रात्री 9 ऐवजी 8 वाजल्यापासून सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी असा बदल करण्यात आला आहे.

Advertisement

उल्लेखनीय बाब म्हणजे, हा नियम आता संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्यात लागू केला जाणार आहे. रात्रीच्या संचारबंदीचा आणि आठवड्यातील शनिवार-रविवारची पूर्ण संचारबंदी हा नियम 4 एप्रिलपर्यंत राहील.

Advertisement

अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सेवा अर्थात रुग्णालये आणि औषधालय सुरूच राहतील. यासोबतच दूध विक्री, पेट्रोल-डीझेल, गॅस एजन्सी आणि वृत्तपत्र इत्यादींनाही आधीप्रमाणेच सूट राहील असेही सांगण्यात आले आहे.

Advertisement

हॉटेल, बार, रेस्टॉरंट, परमिट रूम, खाद्यपदार्थांची दुकाने रात्री 8 वाजेपर्यंत खुली ठेवता येतील. एकूण क्षमतेच्या फक्त 50 टक्के ग्राहकांना बसण्याची मुभा. यानंतर एक तास पार्सल सुविधा देता येईल.

Advertisement

खासगी कार्यालये बंद. सरकारी कार्यालये सुरू. शनिवार-रविवारी सर्व बाजारपेठ, मॉल, चित्रपटगृहे, हॉटेल्स बंद. होम डिलिव्हरी सुरू राहील.

Loading...
Advertisement

सामाजिक, धार्मिक, कार्यक्रम, मोर्चे-आंदोलने, आठवडे बाजार, स्विमिंग पूल, क्रीडा स्पर्धा बंद. खेळाडूंनी नियमांचे पालन करून सराव करावा.

Advertisement

शाळा, महाविद्यालये, कोचिंग संस्था, इतर शैक्षणिक संस्था बंद. ऑनलाइन शिकवण्यांचा पर्याय सुरू. राष्ट्रीय, राज्य, विद्यापीठ पातळीवरील ज्या परीक्षा यापूर्वी जाहीर झाल्या आहेत, हॉतिकिटे वाटप झाले आहे त्यांना मार्गदर्शक सूचनांचे पालन करून घेता येईल. वाचनालयांमध्ये क्षमतेच्या 50 टक्के लोकांनाच प्रवेश देता येईल.

Advertisement

4 एप्रिलपर्यंत जिल्ह्यातील सर्व मंगल कार्यालये बंदच राहतील. या तारखांदरम्यान ज्यांचे विवाह ठरले आहेत त्यांच्यासाठी रजिस्टर मॅरेजचा पर्याय खुला राहील.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply