Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

तो प्रकारही चीड आणणारा; प्रवीण दरेकरांनी व्यक्त केला संताप

मुंबई :

Advertisement

औरंगाबादमधील घाटी रुग्णालयात घडलेला प्रकार हा ह्रदय हेलावणारा आहे, परंतु, राज्याच्या आरोग्य व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाल्याचं चित्र यातून दिसून येतं असून आरोग्य व्यवस्थाच “अत्यवस्थ” झाली आहे, अशी टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली.

Advertisement

घाटी रुग्णालयात पायाला जखम झालेली, जखमेला मुंग्या लागलेल्या, माश्या घोंगावत असल्याच्या अवस्थेत एक व्यक्ती घाटी रुग्णालयातील अपघात विभागाच्या पायऱ्यांवर वेदनेने विव्हळत पडून होता, काहींनी अपघात विभागातील डॉक्टरांना ही माहिती दिली, पण दुर्देवाने रुग्णालय प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली गेली नाही,  हे चीड आणणारे आहे. राज्याच्या आरोग्य व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे, अशी टीका दरेकर यांनी केली.

Advertisement

दरेकर म्हणाले की, रुग्णालयातील कुणीही उपचार करण्याकरीता धावले नाहीत, आणि शेवटी जागेवरच त्या व्यक्तीने अखेरचा श्वास घेतला. आपल्या कर्तव्यात अक्षम्‍य कसूर करणारा आरोग्य विभाग आणि रुग्णालय प्रशासन या घटनेला कारणीभूत असुन हे राज्यसरकारचे पाप आहे. करोनासारखं संकट आज राज्यात घोंगावत आहे,  आरोग्य व्यवस्थेवर राज्यसरकारने काटेकोरपणे लक्ष देण्याची आवश्यकता आहे, पण ते दिलं जात नसल्याने अशा निष्पाप लोकांचा नाहक बळी जात आहे, असेही दरेकर यांनी सांगितले.

Loading...
Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply