Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

‘ते’ मुद्दे उपस्थित करून भाजपने मागितलाय गृहमंत्र्यांचा राजीनामा; पहा काय आहेत पॉईंट

मुंबई :

Advertisement

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यासह मुंबई पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आणि काही मुद्यावर सध्या महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. त्यावरून भाजपने गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा मागितला आहे.

Advertisement

ट्विटरवर भाजपने म्हटले आहे की, एक पोलीस अधिकारीच जिलेटीनच्या कांड्या घेऊन मोकाट फिरत होता… आपली सुरक्षा यंत्रणा इतकी ढिसाळ झाली आहे का? गृहमंत्री आणि पोलीस आयुक्त यांना कसलीही माहिती मिळत नाही, हे नवलच! यावरून या दोघांनाही आपापल्या पदावर राहण्याचा हक्क नाही, हे सिद्धच होत आहे.

Advertisement

भाजपा महाराष्ट्र on Twitter: “लॉकडाऊनच्या काळात राज्यातील सामान्य जनता आर्थिक झळ सोसत होती,त्यांना प्रवास करण्याची परवानगी नव्हती. त्याच काळात आपले गृहमंत्री @AnilDeshmukhNCP स्वतःच्या प्रिय बिल्डरांसाठी विशेष पासची सोय करत होते,गोरगरिबांची काळजी नसणारा असा गृहमंत्री राज्याला नको. #ResignAnilDeshmukh https://t.co/7Qqt7nn4Tp” / Twitter

Advertisement

पुढे त्यांनी म्हटले आहे की, राज्यात कोणतीही घटना घडली की गृहमंत्र्यांना कोणीही विचारत नाही. मात्र उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची मांदियाळी सिल्व्हर ओकवर पाहायला मिळते. मग गृहमंत्रीजी तुमचा उपयोग तरी काय ?

Advertisement

राज्यातील कायदा व सुव्यवस्था संपुष्टात आली आहे. महिला अत्याचाराच्या घटना अजूनही थांबल्या नाहीत. राज्यातील मंत्री आणि पदाधिकारीच या घटनांचे साक्षीदार आहेत. मात्र आपले गृहमंत्री मूग गिळून गप्प! राज्यातील माता-भगिनी तुमच्यामुळेच असुरक्षित आहेत, त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपने केली आहे.

Advertisement

भाजपा महाराष्ट्र on Twitter: “राज्यातील कायदा व सुव्यवस्था संपुष्टात आली आहे. महिला अत्याचाराच्या घटना अजूनही थांबल्या नाहीत. राज्यातील मंत्री आणि पदाधिकारीच या घटनांचे साक्षीदार आहेत. मात्र आपले गृहमंत्री @AnilDeshmukhNCP मूग गिळून गप्प! राज्यातील माता-भगिनी तुमच्यामुळेच असुरक्षित आहेत. #ResignAnilDeshmukh https://t.co/RlPdwOXTSb” / Twitter

Loading...
Advertisement

लॉकडाऊनच्या काळात राज्यातील सामान्य जनता आर्थिक झळ सोसत होती,त्यांना प्रवास करण्याची परवानगी नव्हती. त्याच काळात आपले गृहमंत्री स्वतःच्या प्रिय बिल्डरांसाठी विशेष पासची सोय करत होते,गोरगरिबांची काळजी नसणारा असा गृहमंत्री राज्याला नको, असेही भाजपने लिहिले आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply