Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

नाना पटोले भिडले भाजपला; मोदी-शाह यांच्या उदाहरणासह केली ‘अशी’ टीका..!

मुंबई :

Advertisement

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीवर उघड नाराजी जाहीर करून भाजपला ‘जय श्रीराम’ केला होता. आता त्याच पटोले यांना काँग्रेस पक्षाने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष केल्याने भाजपने त्यांना लक्ष्य केले आहे. त्यावर पटोले हेही पेटून उठले आहेत.

Advertisement

दोन्ही बाजूने ट्विटरवर जोरदार आरोप-प्रत्यारोप चालू झालेले आहेत. आताही पटोले यांनी म्हटले आहे की, दिल्लीच्या इशारावर कोण चालतो हे जनतेला ठाऊक आहे. काँग्रेस पक्षात स्वतंत्र निर्णय घेता येतो, परंतु भाजपामध्ये मोदी, शाह यांना विचारावं लागते. भाजपा हा जनतेचा पक्ष आहे, तर विरोधी पक्षात का? कॉंग्रेसमध्ये लोकशाही आहे, हिटलरशाही नाही. सुशांत सिंह प्रकरणाच्या चौकशीचं काय झालं, जनतेला कळू द्या.

Advertisement

इटलीहून आलेल्या आदेशांचं पालन करणाऱ्यांनी बदनामीचा बाजा वाजवू नये, असे महाराष्ट्र भाजपने ट्विटरवर म्हटल्याने या वादाला तोंड फुटले होते. त्यावर ‘दिल्लीच्या इशाऱ्यांवर गल्लीत शेपूट हलवणाऱ्या नेत्यांनी भाजपाला ज्ञान देण्याचा प्रयत्न करू नये. भाजपा हा जनतेचा पक्ष आहे. काँग्रेसच्या गांधी परिवाराप्रमाणे घराणेशाही भाजपात चालत नाही’ असा टोला भाजपने लगावला होता.

Advertisement

त्यावर आता पटोले यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तर, भाजपने एक पोस्टर शेअर करून त्यावर लिहिले आहे की, तुमच्या महाभकास आघाडी सरकारने मुंबई आणि महाराष्ट्राची परिस्थिती काय करून ठेवली, हे राज्याच्या सामान्य जनतेलाच ठाऊक आहे. इटलीहून आलेल्या आदेशांचं पालन करणाऱ्यांनी बदनामीचा बाजा वाजवू नये. राज्याच्या हितासाठी काय योग्य-अयोग्य हे भाजपाला ठाऊक आहे… कारण हा भारतीय ‘जनता’ पक्ष आहे.

Loading...
Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply