Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

पोलीस आयुक्तांच्या बदलीवर संजय राउत यांनी व्यक्त केली ‘ही’ भूमिका..!

मुंबई :

Advertisement

सचिन वाझे या पोलीस अधिकाऱ्याप्रकरणी चर्चेत आणि पर्यायाने वादात सापडलेले मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली करण्यात आली असून हेमंत नगराळे यांची मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून सांडी देण्यात आली आहे. त्यावर शिवसेना खासदार संजय राउत यांनी भूमिका मांडली आहे.

Advertisement

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, रजनीश शेठ यांच्याकडे राज्याचे पोलीस महासंचालक पद, संजय पांडे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ आणि  सिंग यांच्याकडे गृहरक्षक दलाची जबाबदारी देण्यात आली आहे.

Advertisement

तर, यावर ट्विटरवर प्रतिक्रिया देताना राउत यांनी म्हटले आहे की, मुंबई तसेच महाराष्ट्र पोलीस दलास नवे नेतृत्व मिळाले आहे. आपल्या पोलीस दलाची परंपरा महान आहे. एकाद्या वावटळीत पोलीस दलाची पडझड होईल या भ्रमात कोणीच राहू नये. खाकी वर्दीचा मान व शान यापुढील काळात अधिक हिमतीने व सचोटीने राखला जाईल हीच अपेक्षा.

Advertisement

एकूणच आता पोलीस आयुक्तांच्या बदलीमुळे आणखी वेगळे राजकारण त्याची शकयता व्यक्त होत आहे.

Loading...
Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply