Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

बिग ब्रेकिंग : म्हणून मुंबई पोलीस आयुक्तांना बदलले; नगराळे यांना मिळाली संधी..!

मुंबई :

Advertisement

मुंबई पोलिसांविषयी जनतेच्या मनात निर्माण होत असलेली नकारात्मक भूमिका आणि विरोधी पक्षाने केलेल्या हल्लाबोलची दखल घेऊन महाविकास आघाडी सरकारने आयुक्तांची बदली केली आहे. गृहमंत्री बदलण्याच्या मागणीकडे लक्ष न देता सरकारने थेट अधिकारी बदलले आहेत.

Advertisement

सचिन वाझे या पोलीस अधिकाऱ्याप्रकरणी चर्चेत आणि पर्यायाने वादात सापडलेले मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली करण्यात आली आहे. सिंग यांना गृहरक्षक दलामध्ये बदली करताना त्यांच्या जागेवर हेमंत नगराळे यांची मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली आहे.

Advertisement

वाझे प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून परमबीर सिंग हेही टीकेचे धनी झाल्याने त्यांच्या बदलीची चर्चा सुरू होती. अखेर आज महाराष्ट्र राज्य सरकारने त्यांच्या बदलीचे आदेश काढले आहेत. गृहमंत्री यांनी म्हटले आहे की, रजनीश शेठ यांच्याकडे राज्याचे पोलीस महासंचालक पद, संजय पांडे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ आणि  सिंग यांच्याकडे गृहरक्षक दलाची जबाबदारी देण्यात आली आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Loading...
Advertisement

ANIL DESHMUKH on Twitter: “सरकारचा मोठा निर्णय श्री हेमंत नगराळे होणार नवे मुंबई पोलीस आयुक्त श्री रजनीश शेठ यांच्या कडे पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य या पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री संजय पांडे यांच्या कडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जवाबदारी श्री परमवीर सिंह यांच्या कडे गृह रक्षक दलाची जवाबदारी” / Twitter

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply