Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

अदानींची कमाल; स्वतः झाले मालामाल आणि चीनच्या जॅक मा यालाही दिलाय झटका..!

मुंबई :

Advertisement

सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यानंतर देशातील दुसरे दिग्गज उद्योगपती गौतम अदानी यांचीही घोडदौड जोरात सुरू आहे. जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पंचविसाव्या स्थानावर उडी घेताना अदानी यांनी थेट चीनच्या जॅक मा यालाही झटका दिला आहे.

Advertisement

उद्योगपती गौतम अदानी यांनी कमाईच्या बाबतीत चिनी उद्योगपती जॅक मा याला मागे टाकले आहे. यावर्षी अदानी समूहाच्या अध्यक्षांची संपत्ती 17.1 अब्ज डॉलर्सने वाढली आहे. यासह, ब्लूमबर्ग बिलियनेर्स इंडेक्सनुसार, ते आता जगातील 25 वा श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्यांच्याकडे सध्या 50.9 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे.

Advertisement

त्याचवेळी अलिबाबाचे संस्थापक जॅक मा या यादीत 26 व्या स्थानावर आहेत. 2021 मध्ये आतापर्यंत त्यांची संपत्ती 43.7 दशलक्ष डॉलर्सने घटली आहे. त्यांच्याकडे आता 50.2 अब्ज डॉलर्सची मालमत्ता आहे.

Advertisement

अदानीची संपत्ती वेगाने वाढली आहे. अदानी कंपनीच्या बंदर व उर्जा व्यवसायावरील गुंतवणूकदारांचा विश्वास वाढणे हे या वाढीचे खरे गणित आहे. या काळात आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या संपत्तीतही 5.08 अब्ज डॉलरने वाढ झाली आहे. त्याच्याकडे 81.8 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. अंबानी जगातील दहावे श्रीमंत व्यक्ती आहेत.

Loading...
Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply