Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

चीनने केली आणखी एक नवीच खेळी; पहा कोणता नियम लागू केलाय भारतासाठी

दिल्ली :

Advertisement

भारताचा श्रीमंत आणि मुजोर शेजारी असेलल्या चीनने भारतासह जगातील 20 देशांसाठी नवाच नियम लागू केला आहे. तो नियम आहे चीनी व्हिसा घेतानाचा. होय, त्यांच्या देशाचा व्हिसा हवा असेल तर त्यांचीच लस घेणे बंधनकारक आहे.

Advertisement

चीनमध्ये व्यवसाय किंवा अभ्यासासाठी गेलेल्यांना किंवा जाऊ इच्छिणाऱ्या भारतीयांना आता कोरोनाची चीनी लस घेणे बंधनकारक आहे. चीनने यासंदर्भात परिपत्रक कढले आहे. इंडियन एक्सप्रेसच्या अहवालानुसार नवी दिल्लीतील चिनी दूतावासातही ही नोटीस आली आहे.

Advertisement

त्यात म्हटले आहे की, चीनच्या नवीन नियमानुसार भारतासह 20 देशांमधून चीनकडे जाणाऱ्या प्रवाश्याकडे चिनी लस घेतली असल्याचे प्रमाणपत्र व्यक्तीकडे असणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत भारतीय प्रवाशांना ही नवीन समस्या उद्भवली आहे. कारण, चीनी लस भारतात उपलब्ध नाही आणि भारतातच यापूर्वी पाच लस मंजूर झाल्या आहेत त्यांचा उपयोग करून मग काय फायदा होणार?

Advertisement

ऑस्ट्रेलिया, ग्रीस, इंडोनेशिया, इस्त्राईल, इटली, नायजेरिया, नॉर्वे, पाकिस्तान आणि दक्षिण कोरिया येथील लोकांनाही व्हिसा हवा असल्यास चिनी लस घ्यावी लागेल. त्यासंदर्भातच्या नोटिसा संबंधित देशातील चिनी दूतावासात लावल्या आहेत. एका अहवालानुसार या यादीमध्ये अमेरिकेचाही समावेश आहे. चायनीज लस असलेल्या सर्व व्हिसा अर्जदारांना चीनच्या दूतावासात बोलावले जाईल. मगच पुढील कार्यवाही होईल.

Advertisement

विशेष म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) अद्याप चीनी लस मंजूर केलेली नाही. डब्ल्यूएचओने आतापर्यंत फायझर, अ‍ॅस्ट्रॅजेनेका आणि मॉडर्ना यांच्या लसलाच मान्यता दिली आहे. मग चीनची हीच लस घेण्याची मुजोरी नेमकी कोणत्या शास्त्रीय कारणाने, हाही मुद्दा उपस्थित केला जात आहे.

Loading...
Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply