Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

ब्रेकिंग : अमृता फडणवीसांनी केला ठाकरे सरकारवर ‘तो’ धक्कादायक आरोप..!

नागपूर :

Advertisement

पोलीस अधिकारी सचिन वाझे प्रकरणामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारवर दबाव वाढवण्यात विरोधी पक्ष भाजपने यश मिळवले आहे. त्यातच आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि बँकर-गायिका अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर आणखी एक गंभीर आरोप केला आहे.

Advertisement

अमृता फडणवीस यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, एकीकडे नागपूरसारख्या शहरांमध्ये करोना बाधित रुग्णांना भरती करण्यासाठी बेड उपलब्ध नाहीत. तर दुसरीकडे महाराष्ट्र सरकार कोविड सेंटरमधून भ्रष्टाचार करत आहे आणि उद्योगपतींना भीती दाखवून त्यांच्याकडून वसुली करण्याची योजना आपल्याच काही हस्तकांसोबत बनवत आहे.

Advertisement

AMRUTA FADNAVIS on Twitter: “जहां एक तरफ #Nagpur जैसे शहरो में #Corona मरीज़ों को भरती करने की भी अस्पतालों मे जगह नही है,वहाँ दूसरी तरफ #Maharashtra सरकार #covid centres में भ्रष्टाचार कर रही है और उद्योगपातियों को डराके उनसे वसूली करने की योजनाए अपने ही कुछ पिट्ठुओं के साथ मिलकर बना रही है #SachinWaze 👎” / Twitter

Advertisement

एकूणच राज्यातील करोना रुग्णांचा वाढता प्रकोप आणि त्यातच सरकारपुढील वाढते संकट यात महाराष्ट्राची कोंडी झाल्यासारखे चित्र आहे. सरकार कोणत्याही क्षणी कोसळू शकते असे भाजपचे दावे आहेत. त्यामुळेच यातून ठाकरे सरकार कसा मार्ग काढणार याची सर्वांना उत्सुकता आहे.

Advertisement

वाझे यांना अटक झाल्यानंतर अमृता फडणवीस यांनी पहिल्यांदाच भाष्य केलेले आहे. त्यांनी पहिल्याच फटक्यात सरकारवर थेट भीती दाखवून पैसे वसूल केले जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

Loading...
Advertisement

तर, भाजपने सरकारच्या बैठकांवर प्रश्न उपस्थित करताना म्हटले आहे की, चौकशी होऊ द्या मगच वाझेंवर कारवाई करू अशीच तुमची भूमिका होती. अचानक वर्षा या तुमच्या अधिकृत निवासस्थानी मध्यरात्रीपर्यंत गृहमंत्र्यांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत काय खलबंत सुरू झाली आहेत, मुख्यमंत्री साहेब?

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply