Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

बैठकीला सुरुवात; मोठ्या निर्णयाच्या शक्यतेने सर्वांचे लागले लक्ष

मुंबई :

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाढत्या करोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर बैठक बोलावली आहे. त्या बैठकीला सुरुवात झाली असून, त्यात कोणता मोठा निर्णय होणार याकडे देशाचे लक्ष लागले आहे.

Advertisement

दुपारी १२.३० वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वार ही बैठक सुरू झाली आहे. देशभरातील सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि प्रमुख अधिकारी या बैठकीत सहभागी होत आहेत. महाराष्ट्रासह इतर राज्यातही करोनाचा उद्रेक होत असल्याने केंद्र सरकार कोणते निर्देश किंवा ठोस आदेश देणार याचीच देशाला उस्तुकता आहे.

Advertisement

करोनाचा प्रसार रोखण्यासाठीच्या उपाययोजना आणि लसीकरणासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे. अशावेळी मग काही कडक निर्बंध करण्यासंदर्भातही पंतप्रधानांकडून सूचना केल्या जाऊ शकतात.

Advertisement

गेल्या २४ तासांत भारतात २८ हजार ९०३ नवीन करोना बाधित रुग्ण आढळले असून १८८ जणांचा मृत्यू झाला असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, गुजरात, तामिळनाडू या राज्यांमध्ये कोविड रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. गुजरात सरकारने मंगळवारी चार मोठ्या शहरांमधील संचारबंदीच्या कालावधीत वाढ केली आहे.

Loading...
Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply