Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

ब्रेकिंग : ‘या’ भाजप खासदारांची आत्महत्या; दिल्लीतील निवासस्थानी लावून घेतला फास

दिल्ली :   

Advertisement

हिमाचल प्रदेशातील मंडी येथील भारतीय जनता पक्षाचे खासदार रामस्वरूप शर्मा यांनी आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे. (Ram Swarup Sharma) रामस्वरूप शर्मा यांचे संशयास्पद परिस्थितीत निधन झाले आहे.

Advertisement

प्राथमिक माहितीनुसार, त्यांनी गळ्याला फास लावून घेत आत्महत्या केली आहे. मात्र  आत्महत्या करण्याचे कारण अजूनही समोर आलेले नाही. दिल्लीतील राममनोहर लोहिया हॉस्पिटलजवळील गोमती अपार्टमेंटमध्ये त्यांचे निवासस्थान आहे.

Advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी स्वत:च्या खोलीत गळफास लावला. दरवाजा आतून बंद होता. त्यांच्या कर्मचार्‍यांनी बोलवल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि दरवाजा तोडला. रामस्वरूप शर्मा यांच्या निधनानंतर आज होणारी भाजपा संसदीय पक्षाची बैठक रद्द करण्यात आली आहे.

Advertisement

संपादन : संतोष वाघ

Loading...
Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply