Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर : पगारात होणार ‘एवढी’ वाढ

मुंबई :

Advertisement

देशात नव्याने लागू होणार असलेले कृषी आणि कामगार कायदे यावरून सगळीकडे चर्चा आहेत. काही लोक याचे समर्थन करत आहेत तर काही लोक याचा विरोध करत आहे. कृषी कायद्यांवरून रान उठलेले असताना सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे.

Advertisement

कोरोना महामारीमुळे जानेवारी ते जुलै 2020 आणि जुलै ते डिसेंबरपर्यंत त्यांना 7 टक्के महाभाई भत्त्यात देण्यात आला नाही. मात्र, आता जानेवारी ते जुलैपर्यंतच्या महागाई भत्ता जाहीर होणार आहे. साधारपणे 4 टक्के महागाई भत्ता असणार आहे.

Advertisement

नवीन कामगार कायद्यानुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात फरक पडणार आहे. सद्यस्थितीत सरकारी कर्मचाऱ्यांना 17 टक्के दराने महागाई भत्ता मिळतो. जुलै 2019 पासून याच दराने डीए मिळत आहे. जानेवारी 2020 मध्ये नवीन डीए लागू करण्यात येणार होता. मात्र, कोरोना महामारीमुळे जुलै 2020 आणि जानेवारी 2021 पर्यंतचा डीए रद्द करण्यात आला.

Advertisement

नवीन पगार कोडनुसार सीटीसीमध्ये मूळ पगार 50 टक्क्यापेक्षा कमी नसली पाहिजे. डीए म्हणजेच महागाई भत्ता वाढणार असल्यानं सर्वच पेन्शनधारकांनाही फायदा होणार आहे. डीएमध्ये होणारी वाढ लक्षात घेता, पेन्शनर्संना 10 हजारऐवजी 16 हजार रुपये पेन्शन दर महिन्याला मिळणार आहे. आता, वाढीव महागाई भत्त्यानुसार केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना 21 टक्क्यंपर्यंत डीए मिळणार आहे.

Loading...
Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply