Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

न्यूज चॅनेल संकटात आल्याने रचला २२५ कोटींचा गुन्हेगारी कट; पहा कुठे घडला हा प्रकार

औरंगाबाद :

Advertisement

माध्यम क्षेत्रात काम करताना एकूण खर्च आणि त्यासाठी जाहिरात व इतर मार्गाने जमा होणारी रक्कम यांचा अवमेळ बसणार नाही याची खबरदारी मालकांना घ्यावी लागते. तसे न झाल्यास माध्यम संस्था तोट्यात येऊन कोलमडू शकते. परिणामी संचालकांना कोणत्या थराला जावे लागते त्याचा वस्तुपाठ देणारी घटना घडली आहे.

Advertisement

अाैरंगाबाद येथे चालवण्यात येणाऱ्या चॅनलच्या व्यवसायात झालेला ताेटा भरून काढण्यासाठी डाटा विक्रीतून पैसे मिळवण्याचा प्रयत्न झाला आहे. देशभरातील विविध बँकांमध्ये वर्षानुवर्षे वापराविना पडून असलेली बँक खाती व काही चालू खात्यांची चाेरलेली गाेपनीय माहितीची विक्री करून या खात्यातील सव्वादाेनशे काेटी परस्पर अाॅनलाइन वळते करण्याचा त्यांचा कट होता.

Advertisement

पुणे पाेलिसांच्या सायबर पथकाने याप्रकरणी ए.एम. न्यूज चॅनलचे दाेन संचालक, दाेन अायटी इंजिनिअरसह ८ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अाराेपींमध्ये अभिनेते रवींद्र मंकणी यांचा मुलगा राेहन मंकणी (शहराध्यक्ष, भाजप चित्रपट आघाडी, पुणे) यांचाही समावेश अाहे.

Advertisement

राेहन रवींद्र मंकणी (सहकारनगर, पुणे), राजेश मुन्नालाल शर्मा (४२, अाैरंगाबाद), परमजितसिंग संधू (४२, अाैरंगाबाद), रवींद्र महादेव माशाळकर (३४, लातूर), अात्माराम हरिश्चंद्र कदम (३४, मंुबई), राजशेखर यदैहा ममिडा (हैदराबाद), विशाल धनंजय बेंद्रे (४५, वाशीम), सुधीर शांतीलाल भटेवरा ऊर्फ जैन (५४, रा. पुणे), अनघा अनिल माेडक (४०, रा.वडगाव बुद्रुक पुणे) अशी अाराेपींची नावे अाहेत. 

Loading...
Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply