Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

पंकजांच्या पराभवाबाबत नामदेव शास्त्रींनी म्हटले ‘असे’; फडणवीसांची फुसच्या मुद्द्यावरही केले भाष्य

बीड / औरंगाबाद :

Advertisement

मागील विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव अनेकांना धक्कादायक होता. या निवडणुकीत भाजपच्या गटानेच म्हणजे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फूस लावून त्यांना पडल्याची चर्चा झाली होती. त्यावर भगवानगडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री महाराज यांनी भाष्य केले आहे.

Advertisement

दिव्य मराठी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत डॉ. नामदेव शास्त्री यांनी म्हटले आहे की, पंकजा यांना वाटतंय की वडील गोपीनाथ मुंडे यांनी गडाला आर्थिकदृष्टया सक्षम करून वैभव प्राप्त करून दिले. प्रत्यक्षात असे काहीही नाही. अर्थात गोपीनाथ मुंडे यांनीच मला गडाच्या गादीवर बसवले हे सुद्धा खरे आहे. पण पंकजा यांना दसऱ्यानिमित्त भाषण करण्याचा मालकी हक्क हवा होता.

Advertisement

त्यांनी पंकजा यांच्या राजकारणावर म्हटले आहे की, त्यांना जनतेच्या मनातील मुख्यमंत्री अशी बिरुदावली मिळाली होती. प्रत्यक्षात त्यांची जनतेशी असलेली नाळ तुटत गेली होती. पंकजांना गडावरून भाषणबंदी केली तर ४०० गावांमधून एकही जण मला जाब विचारायला आला नाही. उलट मी गडाला राजकारणापासून दूर ठेवल्यामुळे समाजाने माझे स्वागतच केले.

Advertisement

फडणवीस यांच्याशी जोडलेल्या मुद्द्यावर त्यांनी म्हटले आहे की, पंकजा यांनी जनतेची कामे करणेही बंद केले होते. पंकजा यांना मी गडावरून राजकीय भाषण करू दिले नाही. म्हणून त्यांचा माझ्यावर राग आहे. त्यांच्या पराभवात माझा काहीही वाटा नाही. देवेंद्र फडणवीस यांनी फूस दिली म्हणून मी त्यांना पराभूत करण्याचे समाजाला आवाहन केले, हे साफ खोटे आहे.

Loading...
Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply