Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

भाजपकडून ‘गांगुली’चीही गुगली; पहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची फटकेबाजी

कोलकाता :
भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सुरु आहेत. सौरवने अद्यापतरी राजकारणाबाबत कोणतीही भूमिका घेतली नसली तरी या निवडणूकीत मात्र त्याच्या नावाची चांगलीच चर्चा सुरु आहे.

Advertisement

केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ यांनी एक मोठं विधान केलं असून भाजपा बंगाल निवडणुकीत सौरभ गांगुलीसारखी खेळी करत धडाकेबाज कामगिरी करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. राजनाथ सिंह यांनी मंगळवारी पश्चिम बंगालच्या मेदनापूर येथे केलेल्या भाषणात भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली याचा उल्लेख केला. सिंग म्हणाले की, जसे गांगुली षटकारांची फटकेबाजी करतो तशी फटकेबाजी या निवडणूकीत भारतीय जनता पक्ष जनतेच्या सहाय्याने करणार आहे.

Advertisement

राजनाथसिंह पुढे म्हणाले की, सौरव गांगुली जेव्हा क्रीजच्या पुढे येवून बल्लेबाजी करायचा तेव्हा असे गृहीत धरले जायचे की तो आता षटकार ठोकेल. लोकसभेतील तुमच्या पाठिंब्याप्रमाणेच आम्ही विधानसभा निवडणुकीत षटकार मारून भाजपचे सरकार स्थापन करणार असल्याचे ते म्हणाले.

Advertisement

दरम्यान, काही काळापूर्वी सौरव गांगुलीच्या भाजप प्रवेशाची चर्चा होती. मात्र, भाजपा किंवा सौरव गांगुली यांनी यावर अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही. संरक्षणमंत्र्यांच्या या ताज्या वक्तव्याला निवडणुकीपूर्वी स्थानिक लोकांशी संपर्क साधण्याचे एक पाऊल म्हणून पाहिले जाऊ शकते.

Advertisement

संरक्षणमंत्री पुढे म्हणाले की, पश्चिम बंगालमध्ये बॉम्ब बनवले जातात आणि राजकीय कार्यकर्ते मारले जातात हे बरोबर आहे काय? ज्या दिवशी आपण सरकार बनवणार त्यादिवशी या सर्वांना धडा शिकवणार असे ते म्हणाले.   

Loading...
Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply