Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

महत्वाची माहिती : आजच्या दिवशी सचिनने तेंडुलकरने केला होता ‘हा’ अनोखा विक्रम..!

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात १६ मार्च या तारखेला अनन्यसाधारण असं महत्व आहे. कारण याच तारखेला भारताचा मास्टर ब्लास्टर फलंदाज सचिन तेंडूलकर याने अनोखा विक्रम आपल्या नावे करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला दबदबा कायम ठेवला होता.

Advertisement

सचिनने १६ मार्चला मीरपूरच्या शेर-ए-बांगला स्टेडियमवर बांगलादेशविरुद्धच्या आशिया चषक सामन्यात अभूतपूर्व विक्रम आपल्या नावे केला होता. या एकदिवसीय सामन्यात सचिनने आपलं ४९ वं शतक पूर्ण केलं. यापूर्वी त्याने कसोटीत ५१ शतकं ठोकली होती. त्यानूसार हे त्याचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील १०० वं शतक होतं.

Advertisement

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतके ठोकणार सचिन हा जगातील एकमेव फलंदाज आहे. त्याच्या आधी कोणीही असा विक्रम करु शकलेलं नाही. या सामन्यात सचिनने आपले शतक पूर्ण केले होते, परंतु टीम इंडियाला हा सामना गमावावा लागला होता. सचिनने या सामन्यात १२ चौकार आणि एका षटकारासह ११४ धावा केल्या. सचिनव्यतिरिक्त विराट कोहलीने ६६ आणि रैनाने ५१ धावांची खेळी केली. या सामन्यात बांगलादेशचा कर्णधार मुशफिकर रहीमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.

Advertisement

भारताने पहिले फलंदाजी करताना भारताने ५ गडी बाद २८९ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल बांगलादेशने चार चेंडू शिल्लक ठेवत हा सामना जिंकला होता. बांगलादेशकडून तमीम इक्बालने सर्वाधिक ७० धावा केल्या. सचिन तेंडुलकर आणि भारतीयांच्यादृष्टीने या सामन्याला महत्त्वाचे स्थान आहे. कारण देशाच्या
सर्वाधिक लाडक्या क्रिकेटपटुने अनोखा विक्रम या दिवशी नोंदवला होता. 

Loading...
Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply