Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

कृषी योजनांतील भ्रष्टाचारप्रकरणी होणार कार्यवाही; पहा नेमके काय आहे प्रकरण

अहमदनगर :

Advertisement

बोगस लाभार्थींशी संगनमत करुन मौजे पिंपरखेड (हसनाबाद ता. जामखेड) येथे जामखेड तालुका कृषी कार्यालयातील संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी शेततळे, कांदा चाळ, फळबाग यांची कामे न करता मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सबंधितांवर गुन्हे दाखल करुन कारवाई करण्याच्या मागणीसाठी बापूसाहेब शिंदे या शेतकर्‍याने जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील भूजल सर्व्हेक्षण कार्यालयाच्या आवारात अमरण उपोषण केले.

Advertisement

मौजे पिंपरखेड (हसनाबाद ता. जामखेड) येथे 2017-18 व 2018-19 या काळात जामखेड तालुका कृषी कार्यालयातील संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी संगनमत करून शेततळे, कांदाचाळ, फळबाग यांची कामे न करताच कागदोपत्री झाल्याचे बनावट दस्तऐवज तयार करून लाखो रुपयांची अफरातफर केली आहे. या कामामध्ये मोठ्या प्रमाणात निधी हडप करण्यात आला असून, सदर प्रकार जन माहिती अधिकारी तथा कृषी अधिकारी यांनी माहिती अधिकार अर्जाद्वारे मागितलेल्या माहितीवरुन दि.8 जानेवारी 2021 रोजी उघडकीस आला आहे.

Advertisement

या भागातील शेततळे, कांदा चाळ, फळबाग यांची कामे प्रत्यक्षात न करता कागदोपत्री दाखवण्यात आले असल्याचा बापूसाहेब शिंदे यांचा आरोप आहे.  तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार करुनदेखील त्याची दखल घेण्यात आलेली नाही. जिल्हाधिकारी यांनी या भागाची प्रत्यक्ष पाहणी करुन बनावट दस्तऐवज तयार करून लाखो रुपयांची अफरातफर करणार्‍या जामखेड तालुका कृषी कार्यालयातील संबंधित अधिकारी, कर्मचारी व बोगस लाभार्थींवार गुन्हे दाखल करुन कारवाई करण्याची मागणी शिंदे यांनी केली.

Advertisement

कृषी उपसंचालक विलास नलगे यांनी सोमवार दि. 22 मार्च पासून तक्रारीची तपासणी सुरु करुन त्याचा अहवाल दि.5 एप्रिल पर्यंत सादर करण्याचे लेखी आश्‍वासन दिल्याने उपोषणकर्ते शिंदे यांनी आपले उपोषण संध्याकाळी उशीरा मागे घेतले. जामखेड पंचायत समितीचे सभापती सुर्यकांत मोरे यांच्या उपस्थितीत ते मागे घेतले गेले. यावेळी कृषीचे तंत्र अधिकारी बाळासाहेब नितनवरे, कृषी सल्लागार संग्राम भिंगारदिवे, अशोक धेंडे, संदीप बोराटे, दत्ता गिरी, पोलीस नाईक भारत गाडीलकर आदी उपस्थित होते.

Loading...
Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे  

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply