Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

म्हणून ‘त्या’ लसचा वापर रोखला अनेक देशांनी; पहा नेमके काय कारण दिलेय त्यास

दिल्ली :

Advertisement

जगभरात करोना विषाणूचा प्रकोप वाढत असतानाच लसीकरण जोरात आहे. मात्र, ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेका या लसबाबत काही संशय असल्याने अनेक युरोपीय देशांनी या लसच्या वापरास रोखलेले आहे. हे देश अभ्यासांती पुढे कोणता निर्णय घेतात याकडे अवघ्या जगाचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

जगभरात कोरोना लसीकरण मोहिमेदरम्यान एस्ट्राजेनेका लस चर्चेचा विषय बनली आहे. युरोपीय देशांनी ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्रॅजेनेका लसवर खबरदारीचा उपाय म्हणून बंदी घातली आहे. युरोपमध्ये ही लस लागू झाल्यानंतर रक्त गोठण्यासंबंधीचे विकार आढळल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. अ‍ॅस्ट्रॅजेनेकावाल्यांनी म्हटले आहे की, लसमुळे रक्त गोठवण्याची समस्या वाढल्याचा कोणताही पुरावा मिळालेला नाही.

Advertisement

नुकतेच नेदरलँड्स आणि आयर्लंडमध्ये अ‍ॅस्ट्रॅजेनेकाच्या लसवर तात्पुरती बंदी घातली गेली आहे. तर, ऑस्ट्रिया, डेन्मार्क, इटली, रोमानिया, बल्गेरिया, लिथुआनिया, एस्टोनिया, लक्झेंबर्ग, लाटविया इत्यादी देशांनी यापूर्वीच यावर बंदी घातली आहे.

Advertisement

जागतिक आरोग्य संघटना असेही म्हणते की सध्या रक्त गोठण्यासंबंधी समस्या ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्रॅजेनेका लसशी संबंधित आहेत हे सिद्ध करण्यासाठी कोणताही पुरावा नाही. तथापि, या क्षणी लसीकरण सुरू ठेवणे आणि लसीच्या संभाव्य दुष्परिणामांची चौकशी करणे आवश्यक आहे.

Advertisement

आतापर्यंत जगभरात 12 कोटी 8 लाखांपेक्षा अधिक लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे, तर मृतांचा आकडा 26 लाख 74 हजारांवर पोहोचला आहे. अमेरिका अजूनही कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित देश आहे. कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या देशांच्या यादीत ब्राझील दुसर्‍या स्थानावर आहे तर भारत तिसर्‍या क्रमांकावर आहे.

Loading...
Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे  

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply