Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

बिग ब्रेकिंग : महाविकास आघाडीचे आणखी एक मंत्री गोत्यात; पोलिसात तक्रार दाखल, बघा काय घडला प्रकार

मुंबई :

Advertisement

सध्या राज्याच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर अस्थिर वातावरण आहे. सध्याच्या सत्ताधारी नेत्यांना विरोधी पक्ष काम करू देत नाही, अशा चर्चा आता लोकसुद्धा करू लागले आहेत.

Advertisement

महाराष्ट्रात कधीही काहीही घडलं तरीही केंद्रीय यंत्रणा नेहमीच त्यात हस्तक्षेप करत असल्याची टीकाही सत्ताधारी नेत्यांकडून होत असते. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे.

Advertisement

सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे (Sachin Vaze Arrest) यांना झालेली अटक आणि त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) अडचणीत आलेले असताना आता राज्याचे उर्जा मंत्री नितीन राऊतही (Nitin Raut) अडचणीत आलेले आहेत.

Advertisement

राऊत यांच्या विरोधात आता मुंबईतील निर्मल नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. भाजपचे (BJP) माध्यम विभागाचे प्रमुख विश्वास पाठक यांनी ही तक्रार दाखल केली आहे. पाठक यांनी म्हटले आहे की, एकीकडे राज्याची कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती अडचणीत असताना उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी बेकायदेशीरपणे राज्य सरकारचं चार्टर्ड विमान वापरलं.

Advertisement

विमान वापरण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांची रितसर परवानगी लागत असते, मात्र अशी कोणतीही परवानगी राऊत यांनी घेतली नसल्याचाही आरोप पाठक यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीकडे केला आहे.

Loading...
Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply