Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

नरेंद्र मोदींना ‘त्या’ प्रकरणात क्लीनचीट दिलेल्या ‘या’ बड्या ऑफिसरची वाझे केसमध्ये एन्ट्री; वाचा, या अधिकाऱ्याचा 7/12

मुंबई :

Advertisement

मुंबईतल्या दक्षिण मुंबई येथील मायकल रोडवर (Mumbai Carmichael Road) हिरव्या रंगाची स्फोटकांनी भरलेली गाडी सापडलेल्या प्रकरणी आता आणखी एक धक्कादायक खुलासा झाला आहे. ज्या दिवशी स्फोटकं ठेवण्यात आली होती त्याच रात्री पीपीई कीट (PPE kit) घातलेली एक व्यक्ती कार मायकल रोडवरुन फेरफटका मारत असल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. ही व्यक्ती सचिन वाझे (Sachin Vaze) असल्याचा संशय राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थना NIA ला आहे.   

Advertisement

आता या केसमध्ये एका बड्या अधिकाऱ्याची एन्ट्री झाली आहे.  या प्रकरणाचा तपास करणारे मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे यांना अटक करणाऱ्या एनआयएनं आता पोलीस दलातील इतर बड्या अधिकाऱ्यांकडे मोर्चा वळवला आहे. त्याचसाठी एनआयएचे महासंचालक योगेश चंदर मोदी मुंबईत आले आहेत.

Advertisement

कोण आहेत योगेश चंदर मोदी :-

Advertisement
  • योगेश चंदर मोदी हे १९८४ च्या आयपीएस बॅचचे अधिकारी आहे.
  • मोदींचा कार्यकाळ हा मे २०२१ रोजी संपत आहे.
  • २०१७ मध्ये वाय. सी. मोदींची एनआयच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली.
  • नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना गोध्र्यात दंगल झाली होती. त्यावेळी वाय. सी. मोदी पोलीस दलात होते. त्यांनी नरेंद्र मोदींना दंगल प्रकरणात क्लीन चीट दिली होती.
  • गोध्रा दंगलीतल्या तीन महत्त्वाच्या प्रकरणांचा तपास त्यांनी केला होता.
  • त्यात नरोडा गाव, गुलबर्ग सोसायटी आणि नरोडा पाटिया प्रकरणांचा समावेश होता.

संपादन : संतोष वाघ

Loading...
Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply