Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

मोबाईल हरवला / चोरी झाल्यास शोधण्यासाठी उपयोगी आहेत ‘या’ ट्रिक्स..!

मोबाईल ही आता शौक नाही, तर जीवनातील एक महत्वाची गरज बनली आहे. दिवसेंदिवस नवीन तंत्रज्ञान आणि फिचर यामुळे मोबाईलची गरज आणखी वाढत आहे. अशावेळी जर आपला मोबाईल हरवला, गहाळ झाला किंवा चोरी झाल्यास डोकेदुखी वाढते.

Advertisement

त्यामुळेच आज आपण अशा पद्धतीने मोबाईलने मध्येच साथ सोडल्यावर काय करायचे, याबाबत माहिती पाहणार आहोत. त्यासाठीचे मुद्दे पुढीलप्रमाणे :

Advertisement

हरवलेला किंवा चोरीला गेलेला स्मार्टफोन शोधणे हे एक आव्हानात्मक काम आहे. आत्तापर्यंत कोणतीही सुविधा उपलब्ध नाही की ज्याद्वारे फोन सहजपणे शोधता येईल. तर, पोलिसांनीही फारच थोड्या प्रकरणात फोन हस्तगत करून दिलेला आहे.

Advertisement

त्यामुळे स्मार्टफोन गमावल्यास किंवा चोरी गेल्यास, अशा काही युक्त्या आपल्याला आपला फोन शोधण्यात मदत करू शकतात. स्मार्टफोनमधील माहिती जसे की बँक खाते तपशील, वैयक्तिक फोटो, व्हिडिओ, कागदपत्रे आणि संपर्क क्रमांक आदीचे जतन केले जातात. अशा परिस्थितीत स्मार्टफोन चोरी म्हणजे आपली माहिती चोरी. त्यामुळे हे काळजीपूर्वक वाचा.

Advertisement

एंटी थेफ्ट अलार्म हा अ‍ॅप डाउनलोड केल्यानंतर सक्रिय करा. यानंतर, जर कोणी आपल्या मोबाइलला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तर मोबाईलमध्ये मोठा गजर वाजेल. गर्दीच्या ठिकाणी कोणी फोन चोरी करण्याचा प्रयत्न केला तर आपणास याद्वारे त्वरित कळेल.

Advertisement

लुकआउट सिक्योरिटी एंड एंटीवायरस या अ‍ॅपने गुगल मॅपच्या मदतीने मोबाईलचे स्थान शोधले जाऊ शकते. जर कोणी चोरी केल्यानंतर आपला फोन बंद केला तर आपल्याला फोनचे शेवटचे स्थान कळेल. हे आपला फोन शोधणे आपल्यास सुलभ करते.

Loading...
Advertisement

थीफ ट्रैकर हे अॅप चोरीचा फोन शोधण्यात उपयुक्त आहे. फोन चोरीनंतर, याद्वारे आपण चोरी केलेल्या व्यक्तीची संपूर्ण माहिती मिळवू शकता. यात एक वैशिष्ट्य असेदेखील आहे. ज्यात फोनशी छेडछाड झाल्यास हे आपोआप छेडछाड करणाऱ्याचा फोटोवर काढून त्या स्थानासह मालकांना मेल पाठवेल.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply